खरंच बोनी कपूर यांनी उर्वशी रौतेलाच्या प्रायव्हेट पार्टला सगळ्यांसमोर केलं होतं का टच?

बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सौंदर्याच्या बाबतीत अव्वल आहे.

Updated: Dec 8, 2021, 09:07 PM IST
खरंच बोनी कपूर यांनी उर्वशी रौतेलाच्या प्रायव्हेट पार्टला सगळ्यांसमोर केलं होतं का टच?

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला सौंदर्याच्या बाबतीत अव्वल आहे. लोक तिच्या प्रत्येक लूकचं भरभरुन कौतुक करतात. पण या अभिनेत्रीमुळे इंडस्ट्रीत बरेच वादही झाले आहेत.  जान्हवी कपूरचे वडील आणि सुप्रसिद्ध चित्रपट निर्माते बोनी कपूर यांच्याशी या अभिनेत्रीचं नाव एकेकाळी जोडलं गेलं होतं आणि त्याचबरोबर एका व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीला चांगलाच धक्का बसला होता.

बोनी आणि उर्वशीचा व्हिडिओ
बोनी कपूर आणि उर्वशी रौतेला 2019 मध्ये जयंतीलाल गढा यांच्या मुलाच्या रिसेप्शनला पोहोचले होते. यादरम्यान जेव्हा दोघांची भेट झाली तेव्हा दोघंही एकमेकांच्या खूप जवळ दिसले आणि त्यानंतर फोटोसाठी पोज देताना बोनी कपूरचा हात उर्वशी रौतेलाच्या त्या जागी गेला की व्हिडिओ पाहून प्रत्येकजण या दोघांवर नाराज झाले. चाहत्यांना बोनी कपूरची ही कृती आवडली नसावी आणि त्यामुळेच या दोघांनाही खूप ट्रोल देखील करण्यात आलं होतं.

अभिनेत्रीकडून स्पष्टीकरण
हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अभिनेत्रीने स्पष्टीकरण दिलं होतं. एका मुलाखतीध्ये बोलताना उर्वशी म्हणाली होती की, ही बातमी उगीच आगीसारखी पसरवली गेली. रातोरात हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. खरंतर असं काहीच नव्हतं. मी सुपस्टार अजितसोबत सिनेमात काम करणार होती. ती एक तामिळ फिल्म होती. मात्र डेट्समुळे मी हा सिनेमा करु शकले नाही.

'चुकीच्या एंगलने घेतला फोटो'
उर्वशी रौतेला पुढे म्हणाली, 'मी त्याला आधीच ओळखत होते. मी त्याच्याबरोबर काम करू शकले नाही, याचा अर्थ असा नाही की, माझे त्यांच्याशी संबंध नाहीत. हा एक शानदार जेस्चर होता. मी पार्टीत एंट्री केली होती. बोनी कपूर पहिल्यापासूनच तिथे होते. उर्वशी रौतेला पुढे महणाली, 'ज्या पद्धतीने हा व्हिडिओ काढला होता. ते खूप विचित्र होतं. या व्हिडिओचा एंगल खूप वेगळा होता. आणि यामुळे सगळ्यांनीच याचा बाऊ केला. हे माझ्यासाठी खूप त्रासदायक आणि डोकेदुखी होती. त्या व्हायरल व्हिडिओनंतर माझा फोन 7 दिवस नॉनस्टॉप वाजत होता. मला माहित आहे की, हे त्यांच्यासाठी देखील विचित्र होतं.

वृत्तपत्राविरोधात ट्विट केलं होतं

त्यावेळी एका वृत्तपत्राने उर्वशी रौतेलाच्या व्हिडिओवर डोंट टच लिहून प्रकाशित केलं होतं. त्यानंतर उर्वशीने ट्विटरवर लिहिलं, 'एका प्रसिद्ध वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे. आता तुम्ही महिला सशक्तीकरण आणि स्वातंत्र्याबद्दल बोलू नका. स्त्रियांचा आदर कसा करायचा हे तुम्हाला माहीत नाही.