वैदेही परशुरामीने घेतली नवी कार, सोशल मीडियावर चर्चा

सोशल मीडियावर वैदेहीचीच चर्चा 

Updated: Apr 15, 2021, 01:56 PM IST
वैदेही परशुरामीने घेतली नवी कार, सोशल मीडियावर चर्चा

मुंबई : आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाने अभिनेत्री वैदेही परशुरामी (Vaidehi Parashurami) प्रेक्षकांच्या मनात घर निर्माण केलंय. वैदेही सोशल मीडियावर खूप ऍक्टिव असते, याच माध्यमातून चाहत्यांशी संवाद साधत असते. आपले फोटो आणि डान्सचे व्हिडिओ असे पोस्ट करत असते. गुढी पाडव्याच्या दिवशी वैदेहीने एक खास फोटो पोस्ट केला आहे. तिच्या या पोस्टवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

अभिनेत्री वैदेही परशुरामीने नवं वर्षाच्या निमित्ताने कार खरेदी केली आहे. सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिने तिचा आनंद व्य़क्त केला आहे. ” रथ-सारथी,… नवं वर्ष..नवी सुरुवात..घरी स्वागत आहे.” असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे. वैदेहीने तिची स्वत: पहिली कार घेतल्याने तिला चांगलाच आनंद झाला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Vaidehi Parashurami (@parashuramivaidehi)

वैदेही लवकच ‘झोंबिवली’ या सिनेमात अमेय वाघ आणि ललित प्रभाकर यांच्यासोबत झळकणार आहे. वैदेहीने ‘वेड लागी जीवा’ या सिनेमातून मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलंय.तसचं रणवीर सिंहसोबत वैदेहीनी ‘सिम्बा’ सिनेमात महत्वाची भूमिका साकारली आहे.

हिंदी सिनेसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत वैदेही 'वजीर' सिनेमात झळकली होती. तसेच 'काशिनाथ घाणेकर' सिनेमात कांचन घाणेकरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेतून वैदेहीन रसिकांचं मन जिंकली आहे.