वाणी कपूर आगामी चित्रपटात होणार पोर्न स्टारची डुप्लिकेट

'चंदीगड करे आशिकी' चित्रपटात ट्रान्सवुमनची भूमिका साकारणारी वाणी कपूर आणखी एका बोल्ड भूमिकेसाठी तयारी करत आहे.

Updated: Jun 22, 2022, 06:27 PM IST
वाणी कपूर आगामी चित्रपटात होणार पोर्न स्टारची डुप्लिकेट  title=

Vani Kapoor in Dinesh Vijan’s Next Film: गेल्या वर्षी आलेल्या 'चंदीगड करे आशिकी' चित्रपटात ट्रान्सवुमनची भूमिका साकारणारी वाणी कपूर आणखी एका बोल्ड भूमिकेसाठी तयारी करत आहे. वाणी कपूर बऱ्याच दिवसांपासून एका सोलो-प्रोजेक्टची वाट पाहत होती. तिची ही प्रतीक्षा आता संपलेला दिसत आहे. निर्माता दिनेश विजान यांच्या आगामी चित्रपटात ती एका पोर्न स्टारच्या चेहऱ्याशी मिळतीजुळती असलेल्या मुलीची भूमिका साकारणार आहे. यामुळे या मुलीला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागते, हे या चित्रपटात दाखवण्यात येणार आहे. 

2013 मध्ये तिच्या कारकिर्दीला सुरुवात करूनही, वाणी जवळपास दशकभरात फारशी छाप पाडू शकली नाही. निर्माता दिनेश विजान यांचा 'सर्वगुण संपन्न' हा चित्रपट वाणीच्या कारकिर्दीचा टर्निंग पॉईंट ठरू शकतो, असे चित्रपट समीक्षकांचं मत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनेश विजन एका छोट्या शहरातील मुलीची कथा रुपेरी पडद्यावर आणणार आहे. ही मुलगी हुबेहुब एका लोकप्रिय पॉर्न स्टारसारखी दिसते. सुरूवातीला ही मुलगी नाराज होते, पण हळूहळू ती मानसिकदृष्ट्या सक्षम होते. आत्मविश्वासाने समाजातील घाणरेड्या विचारांच्या लोकांचा पर्दाफाश करते. ती त्यांना धडाही शिकवते. हे कॅरेक्टर एक अभिनेत्री म्हणून नवीन ओळख देईल.

हा चित्रपट समाजाच्या त्या दुटप्पी मानकांवर आघात करेल, ज्यामध्ये एकीकडे पॉर्न पाहणाऱ्या देशांमध्ये भारताचा क्रमांक वरचा आहे आणि दुसरीकडे लोक नैतिकतेची ओरडही करतात. या चित्रपटापूर्वी ती पुढील महिन्यात प्रदर्शित होणाऱ्या रणबीर कपूर स्टारर 'शमशेरा' या चित्रपटात दिसणार आहे. फिल्ममध्ये ती एका डान्सरची भूमिका साकारत असल्याची चर्चा आहे.