रणबीर कपूर लग्नानंतर बायकोच्या हातचं बाहुलं! नीतू कपूर यांनी सांगितलं, "पाच दिवसांतून एकदाच..."

लग्नानंतर रणबीरमध्ये काही बदल झाला आहे का? नीतू कपूर यांनी यावर दिलखुलासपणे मत मांडलं आहे.

Updated: Jun 22, 2022, 03:28 PM IST
रणबीर कपूर लग्नानंतर बायकोच्या हातचं बाहुलं! नीतू कपूर यांनी सांगितलं, "पाच दिवसांतून एकदाच..."

Neetu Kapoor On Ranbir: रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दोन महिन्यांपूर्वी लग्न बंधनात अडकले आहेत. या लग्नात घरच्यांनीही खूपच धमाल केली होती. लग्नाचे विधी आटोपताच सर्वजण आपापल्या कामात व्यस्त झाले. पण लग्नानंतर रणबीरमध्ये काही बदल झाला आहे का? नीतू कपूर यांनी यावर दिलखुलासपणे मत मांडलं आहे. रणबीरची लग्नानंतरची काय स्थिती आहे? याबाबत सांगितलं.

आलियाशी तुझे नाते कसे आहे?

पाच वर्षांच्या रिलेशनशिपनंतर रणबीर आणि आलियाने एकमेकांचा हात धरून सात फेरे घेतले. या लग्नामुळे दोन्ही कुटुंबीय खूप खूश आहेत. अलीकडेच रणबीरची आई म्हणजेच नीतू कपूर यांनी या लग्नाबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, आलियासोबतचे नाते तेच आहे जसे माझे माझ्या सासूसोबत होते. नीतू यांनी सांगितलं की, 'मला वाटतं की सासू आणि सून यांच्यात काही फरक असेल तर तो नवऱ्याचा दोष आहे. कारण जेव्हा आईवर खूप प्रेम करता आणि नंतर बायकोच्या हातचं बाहुलं होता, तेव्हा आईला सहन होत नाही. जर तुम्ही तुमच्या आई आणि पत्नीच्या प्रेमात संतुलन राखले तर सर्व काही ठीक होईल.'

रणबीर पाच दिवसातून एकदा फोन करतो

नीतू यांनी पुढे सांगितलं की, तिला रणबीरसोबत कोणतीही अडचण नाही. तो प्रेम संतुलित ठेवतो. रणबीर आई-आई करत नाही. तो पाच दिवसांतून एकदा फोन करतो, त्यांची प्रकृती चौकशी करतो. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. 

नीतू कपूर यांचा चित्रपट

नीतू कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर त्या लवकरच 'जुग जुग जिओ' या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 24 जून रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात नीतू कपूरशिवाय अनिल कपूर, वरुण धवन आणि कियारा अडवाणी महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सर्व कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करत आहेत.