Vanita Kharat: '...तुच माझा महाराष्ट्र अन् तुच माझी हास्यजत्रा', वनिताने लग्नात घेतलेला उखाणा ऐकला का?

वनितानं तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा उल्लेख करत उखाणा घेतल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे.

Updated: Feb 5, 2023, 01:13 AM IST
Vanita Kharat: '...तुच माझा महाराष्ट्र अन् तुच माझी हास्यजत्रा', वनिताने लग्नात घेतलेला उखाणा ऐकला का?
Vanita Kharat,Sumit Londhe,

Vanita Kharat Wedding: अभिनेत्री वनिता खरातनं (Vanita Kharat) सुमित लोंढेसोबत (Sumit Londhe) विवाहबंधनात अडकले आहे. मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत वनिता व सुमितचा लग्नसोहळा पार पडला. वनिताच्या पांढऱ्या रंगाची साडी नऊवारी साडी लूक (Vanita Kharat Wedding Look) पाहण्याजोगा होता. तिच्या लग्नाचे फोटो ((Vanita Kharat Wedding photos) तुफान व्हायरल होत आहेत. त्यातील तिने उखाणा घेतलाय, त्याचा व्हिडिओ देखील सध्या मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय.(Vanita Kharat Wedding special ukhana for her husband sumit londhe wedding video goes viral)

वनिताच्या लग्नसोहळ्याचे त्याचबरोबर हळद आणि मेहंदी समारंभाचे फोटो सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाले होते. त्यानंतर आता तिचा उखाणा चर्चेचा विषय आहे. टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा, सुमित तुच माझा महाराष्ट्र अन् तुच माझी हास्यजत्रा, असा उखाणा तिने (Vanita Kharat ukhana) यावेळी घेतला आहे.

आणखी वाचा - Urfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!

कबिर सिंहच्या नादात पुष्पा देशभर पळाली. वनिताची प्रिती सुमितलाच मिळाली, असा उखाणा देखील तिने लग्नाच्या मंडपात घेतला आहे. तू दिसतेस खूप सुंदर साडीवर, इथून पुढे तुला फिरवणार माझ्या गाडीवर, असं म्हणत सुमितने देखील लग्नाच्या मंडपात चार चांद लावले. वनितानं तिच्या महाराष्ट्राची हास्यजत्रा (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमाचा उल्लेख करत उखाणा घेतल्याने सध्या तो चर्चेचा विषय आहे.

पाहा Video - 

दरम्यान, वनिताचा होणारा नवरा सुमित (Sumit Londhe) एक व्हिडीओ क्रिएटर आणि ब्लॉगर आहे. त्याला फिरण्याचीही प्रचंड हौस आहे. वनिताने सुमितच्या वाढदिवशी फोटो शेअर करत प्रेमाची कबुली दिली होती. त्यानंतर हे जोडपं चांगलंच चर्चेत आल. त्यानंतर त्यांनी लग्नाचा विचार केला आणि आज साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत.