Urfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!

Urfi Javed Video: उर्फीने हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की... तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल!

Updated: Feb 5, 2023, 12:07 AM IST
Urfi Javed: उर्फी हा माज बरा नव्हे, हेयरड्रेसरसोबत असं काही केलं की..., Video पाहून तुमचाही पारा चढेल!
Urfi Javed Prank Video

Urfi Javed Prank Video: आपल्या फॅशन (Urfi Javed Fashion) आणि वादामुळे चर्चेत राहणाऱ्या उर्फीचा नवा व्हिडिओ (Urfi Javed New Video) समोर आलाय. उर्फी जावेद कायम चर्चेत राहण्याचा प्रयत्न करते. तिच्या कपड्यांमळे तिला नेहमी टीकेचा सामना करावा लागतो. तर दुसरीकडे राजकारणाच्या कट्ट्यावर देखील तिची चर्चा असल्याचं पहायला मिळत होतं. अशातच यावेळी उर्फी जावेदने त्याच्या आउटफिटचा व्हिडिओ (Urfi Javed Viral Video) शेअर केला आहे. त्यामुळे उर्फी ट्रोल होताना दिसत आहे. (urfi javed sexy video did prank with her team threw water on hair dress netizens trolled urfi hot bold video)

यावेळी उर्फीने कोणतंही विचित्र वक्तव्य दिलेले नाही. तर यावेळी तिने आपल्या खोडकर शैलीत असं काही केलं ती तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल. या व्हिडीओमध्ये तिचे हेअर स्टायलिस्ट, मेकअपमन काम करताना दिसत आहेत. त्यावेळी त्याठिकाणी एक मुलगी उर्फीची हेअरस्टाइल करत असते. त्यावेळी उर्फीला राग अनावर झाला.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Uorfi (@urf7i)

यांना सेटवर येऊन काय होतं? तुमचं डोकं ठिकाण्यावर नाही का? काम नसेल करायचं तर घरी जा, असं उर्फी व्हिडिओमध्ये म्हणताना दिसत आहे. त्यावेळी तिला संताप अनावर झाला. उर्फीने त्यावेळी हेयरड्रेसरच्या तोंडावर पाणी ओतलं.  त्यामुळे उर्फीला नेमकं काय झालंय?, असा सर्वांना प्रश्न पडला. त्याच्या दुसऱ्याच क्षणाला चित्र पालटलं. 

आणखी वाचा- Urfi Javed : मॉडेल उर्फी जावेद हिच्या अडचणीत वाढ, मुंबई पोलिसांकडून चौकशीचे आदेश

दरम्यान, हा सर्व प्रकार झाल्यानंतर उर्फी जोरात हसू लागते. त्यानंतर सर्वांना जाणवतं की, हा प्रँक आहे.  मी तिच्या चेहऱ्यावर पाणी ओतणार हे तिला माहित होतं. तुम्ही सगळ्यांनी ओव्हर अॅक्टिंग करणं बंद करा, असंही उर्फी याव्हिडिओ शेअर करताना म्हणाली आहे. मात्र, नेटकऱ्यांनी उर्फीला चांगलंच धारेवर धरलंय. त्यामुळे तिने हा व्हिडिओ तिच्या अकाऊंटवरून काढून टाकला आहे.