मुंबई : बॉलिवूड अभिनेता वरुण धवनच्या घरी एक छोटा पाहुणा आला आहे. ज्यामुळे संपूर्ण धवन कुटूंबात उत्सवाचं वातावरण निर्माण झालं आहे. खरंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये रोहित धवन आणि त्याचे वडील डेव्हिड धवन हॉस्पिटलच्या बाहेर स्पॉट झाले आहेत. पापाराझींनी देखील ही बातमी कन्फर्म केली आहे.
खरंतर वरुण धवन काका झाला आहे. वरुणचा भाऊ रोहित धवन आणि त्याची पत्नी जान्हवी धवन दुसऱ्यांदा आई-वडील झाले आहेत. जान्हवी धवनने एका मुलाला जन्म दिला आहे. रोहित आणि जान्हवी हे आधीच एका मुलीचे पालक आहेत.
रुग्णालया बाहेर पापाराझींनी जेव्हा रोहित धवनला पाहिले तेव्हा त्याचे वडील झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे, ज्यावर त्याने उत्तर दिले - 'धन्यवाद.' यानंतर काहीही न बोलता रोहित ताबडतोब वडिलांसोबत गाडीतून निघून गेला.
अलीकडेच वरुण धवनची पत्नी नताशा दलाल हिने जान्हवी धवनसाठी बेबी शॉवर पार्टी आयोजित केली होती, ज्याचे अनेक फोटो व्हायरल झाले होते.
यावेळी जान्हवी प्रिंटेड फ्लोरल ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत होती. यापूर्वी जान्हवी धवनने 2018 मध्ये एका मुलीला जन्म दिला होता, जिचे नाव या जोडप्याने नियारा ठेवले आहे.
वरुण धवन अनेकदा आपल्या भाचीसोबतचे फोटो शेअर करत असतो. वरुण धवनचा भाऊ रोहित धवन हा वडील डेव्हिडसारखा प्रसिद्ध दिग्दर्शक असल्याची माहिती आहे. त्याने वरुण धवन आणि जॉन अब्राहमसोबत 'ढिशूम' हा चित्रपट बनवला, जो बॉक्स ऑफिसवर हिट ठरला.
वरुण धवनच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या तो त्याच्या नवीन चित्रपट 'बावल'मुळे चर्चेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन 'दंगल' आणि 'छिछोरे' फेम दिग्दर्शक नितेश तिवारी करत आहेत.
या चित्रपटात वरुण धवनसोबत जान्हवी कपूर दिसणार आहे. काही दिवसांपूर्वी वरुण धवन लखनऊमध्ये या चित्रपटाचे शूटिंग करत होता, ज्याच्या सेटवरून वरुण धवनचा लूकही लीक झाला होता. वरुण आणि जान्हवी कपूरचा हा चित्रपट 7 एप्रिल 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.