मुंबई:अभिनेता वरुन धवन सध्या त्याच्या बहुप्रतिक्षीत सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित डान्स सिनेमात वरुन झळकणार आहे. 'ABCD 3' असे या सिनेमाचे नाव आहे. नुकताच वरुनने त्याचे पंजाबचे शूटिंग संपवले असून शूटिंगच्या वेळेस त्याच्या पायाला दुखापत झाली आहे. त्याच्या गुडघ्यांना गंभीर इजा झाले असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. वरुन लवकरात लवकर दुखापतीतून सावरण्याचा प्रयत्न करत आहे. ८ फेब्रुवारी रोजी त्याच्या लंडन शूटिंगचा प्रारंभ होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार ,'ABCD 3' सिनेमाची टीम पंजाबयेथे अभिनेत्री सोनम बजवा सोबत एका गण्याची शूटिंग करत होते. शूटींगची सुरुवात सकाळी ७ वाजता झाली असून दुपारी २ वाजता संपली. या गाण्यात वरुन वेग-वेगळे नृत्य सादर करताना दिसणार आहे.
गाण्याच्या शूटिंगमध्ये त्याचा गुडघा जोरात जमीनीवर आपटल्याने त्याला गंभीर दुखापत झाली. सध्या वरुन मुंबईत परतला असून दुखापतीवर उपचार घेत आहे. गंभीर दुखापत झाली असताना देखील तो सिमेनासाठी नियमित नृत्याचे रियाझ करत आहे.