प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शम्मी यांचं निधन

प्रसिद्ध बॉलिवूड आणि त्या ८९ वर्षांच्या होत्या.

Amit Ingole Amit Ingole | Updated: Mar 6, 2018, 10:02 AM IST
प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शम्मी यांचं निधन title=

मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड आणि टीव्ही अभिनेत्री शम्मी यांचं निधन झालं आहे. त्या ८९ वर्षांच्या होत्या.

शम्मी यांनी ‘कुली नं १, ‘हम’, गोपीकिशन, हम साथ साथ है’ या गाजलेल्या सिनेमांमध्ये कामे केली. त्याआधी त्यांनी १९४९ ते १९५५ या काळात अने सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्री म्हणूनही काम केले आहे. 

अभिनेत्री शम्मी यांनी २०० पेक्षा जास्त सिनेमांमध्ये वेगवेगळ्या भूमिका साकारल्या. त्यांच्या सिनेमांमधील भूमिकांसोबत त्यांचा मालिकांमधील भूमिकाही खूप गाजल्या. त्यात ‘देख भाई देख’, जबान संभाल के, श्रीमान श्रीमती, कभी ये कभी वो आणि फिल्मी चक्कर सारख्या मालिकांचा समावेश आहे. अभिनेते अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत ट्विट केल आहे. 

शम्मी यांचं खरं नाव नर्गीस रबदी असं आहे. त्यांचा जन्म १९३१ मध्ये झाला होता. शम्मी यांनी त्यांचा पहिला सिनेमा १८ व्या वर्षी उस्ताद पेड्रो हा साईन केला होता. १९४९ मध्ये हा सिनेमा आला होता.