close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांची 'ही' इच्छा ऐकून धक्काच बसेल

वहीदा रेहमान म्हणतात, सो व्हॉsssट?

Updated: Sep 24, 2019, 05:01 PM IST
८१व्या वर्षी वहीदा रेहमान यांची 'ही' इच्छा ऐकून धक्काच बसेल

मुंबई : वाढच्या वयाचा आकडा शरीर थकवू शकतो, मन नाही हे अनेकदा सिद्ध झालं आहे. यावेळी हे सिद्ध केलं आहे, ज्येष्ठ अभिनेत्री वहीदा रेहमान यांनी. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ प्रचंड चर्चेत आला आहे, ज्यामध्ये त्यांनी एक अशी इच्छा व्यक्त केली आहे, जी ऐकून बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल खन्ना हिलाही धक्काच बसला. 

वहीदा रेहमान यांची मुलाखत घेतेवेळी ट्विंकलने त्यांना एक प्रश्न विचारला, तुमच्या बकेट लिस्टमध्ये आता कोणती गोष्ट उरली आहे?  बकेट लिस्ट म्हणजे एक अशी अलिखीत किंवा लिखीत स्वरुपातील यादी, ज्यामध्ये आपल्य़ा मनीच्या अनेक इच्छा असतात. त्यातीत अनेक इच्छा पूर्ण होतात, तर काही अपूर्णच राहतात. पण, कित्येकजण या इच्छांच्याच बळावरच आयुष्याचा आनंद घेत असतात. 

ट्विंकलच्या या बकेट लिस्टच्या प्रश्नाचं उत्तर देत, वहीदा रेहमान यांनी त्यांची एक इच्छा लगेचच सांगितली. 'स्कुबा डायव्हिंग', असं त्या पटकन म्हणाल्या. त्यांचं हे उत्तर ऐकून, या वयात तेही ८१व्या वर्षी?, असा प्रश्न ट्विंटकने आश्चर्यचकित भावनेने विचारला. तिची ही प्रतिक्रिया पाहून, 'हो..... त्यात काय.....' (सो.... व्हॉट?), असाच प्रतिप्रश्न रेहमान यांनी केला. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह पाहण्याजोगा होता. 

खुद्द ट्विंकलनेच सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला. त्यांच्या धाडसाची आणि उत्साहाची दाद ट्विंकलने या ट्विटमधून दिली. मुख्य म्हणजे कोणतीही इच्छा व्यक्त करण्यासाठी आणि ती सत्यात उतरवण्यासाठी वयाची मर्यादा कधीच नसते, हेच रेहमान यांनी सिद्ध केलं.