close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

विकी कौशलचं 'या' अभिनेत्रीसोबत पहिलं व्हिडिओ सॉन्ग

विकी कौशलचा पहिलाच म्यूजिक व्हिडिओ

Updated: Aug 23, 2019, 08:07 PM IST
विकी कौशलचं 'या' अभिनेत्रीसोबत पहिलं व्हिडिओ सॉन्ग

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून विकी कौशल आणि नोरा फतेही यांच्या नावाची चर्चा होती. अखेर आज या दोघांचं एक व्हिडिओ सॉन्ग रिलीज करण्यात आलं आहे. नोरा आणि विकी यांनी अरजित सिंहच्या नव्या म्यूजिक व्हिडिओमध्ये काम केलं आहे. विकी कौशलचा हा पहिलाच म्यूजिक व्हिडिओ असल्याने या व्हिडिओबाबत चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी या गाण्याचा टीझर आणि फर्स्ट लूक समोर आला. तेव्हापासूनच या व्हिडिओबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. अखेर टी सीरिजचा हा म्यूजिक व्हिडिओ आज रिलीज करण्यात आला. प्रेमावर आधारित या व्हिडिओला अरजित सिंहने आवाज दिला आहे.

व्हिडिओमधील विकी कौशलच्या अभिनयाला चांगली पसंती मिळत आहे. नोरा आणि विकीच्या प्रेमाची कहाणी व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहे.

विकी कौशल सध्या करण जौहरच्या आगामी 'भूत' आणि 'तख्त' चित्रपटांसाठी काम करत आहे. तसंच विकी आगामी 'उधम सिंह' चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर नोरा रेमो डीसूजा दिग्दर्शित 'स्ट्रीट डान्सर'मध्ये भूमिका साकारणार आहे.