मुंबई : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल सध्या गर्लफ्रेंड कतरिना कैफसोबतच्या लग्नामुळे चर्चेत आहे. त्याचबरोबर, बेअर ग्रिल्सच्या इंटू द वाइल्ड शोमुळे अभिनेता देखील खूप चर्चेत आहे. जिथे विकी बेअरसोबत जिवंत खेकडा खाताना दिसला होता. आणि त्याच्या भीतीशी लढताना दिसला होता. आता त्या गोष्टीही समोर आल्या आहेत ज्या विकीने शोदरम्यान बेअर ग्रिल्ससोबत शेअर केल्या होत्या.
शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या शोमधील त्याचे कठीण दिवस विकीला आठवले. अभिनेत्याने सांगितलं की, ज्या घरात तो लहानपणी राहत होता ते घर 10 बाय 10 इतकं होतं. अभिनेत्याने सांगितलं की, त्या घरात वेगळे स्वयंपाकघर किंवा बाथरुम नव्हतं. विकी म्हणाला, "मी ज्या घरात लहानाचा मोठा झालो ते घर आम्ही बांधलेल्या टेंटपेक्षाही थोडे छोटं असेल. स्वयंपाकघर किंवा बाथरुम नसलेलं 10 बाय 10 चं घर. हीच ती जागा होती जिथे माझा जन्म झाला आणि तेथून माझ्यासोबत माझ्या कुटुंबाने लांबचा प्रवास केला. कुटुंबाप्रमाणे सगळी पावलं एकत्र उचला...आणि हेच तुम्हाला मजबूत बनवतं."
या शोमध्ये आधी अजय देवगण दिसला होता आणि आता विकी कौशल जंगल एक्सप्लोर करण्यासाठी सज्ज झाला आहे. विकी कौशलनेही या शोचा प्रोमो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. प्रोमोची सुरुवात बेअर सांगतो की, तो भारतातील बॉलिवूड स्टार विकी कौशलला भेटणार आहे.
सरदार उधम सिंग हा विकीचा शेवटचा चित्रपट होता. त्याच्या या चित्रपटाचं सर्वत्र कौतुक झालं होतं. याचबरोबर विकी 'सॅम बहादूर' आणि 'द इमॉर्टल अश्वथामा'मध्ये दिसणार आहे. सध्या विकी कौशलचं संपूर्ण लक्ष त्याच्या लग्नावर आहे. जे पुढील महिन्यात डिसेंबरमध्ये होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफचा दिवाळीच्या दिवशी गुपचूप रोका समारंभ पार पडला आहे. बरं, आतापर्यंत दोन्ही बाजूंकडून कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, ज्याची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत.