सख्या बहिणी सख्या जावा? विकी कौशलच्या भावासोबत जुळतायेत कतरिनाच्या बहिणीचे सुत

सनी कौशल आणि इसाबेलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांसोबत डिनर एन्जॉय केल्यानंतर पापाराझीसाठी पोज देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सनी कौशल निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये तर इसाबेलने ब्लॅक स्कर्ट आणि डेनिम टॉप घातला होता. 

Updated: Aug 29, 2023, 04:35 PM IST
सख्या बहिणी सख्या जावा? विकी कौशलच्या भावासोबत जुळतायेत कतरिनाच्या बहिणीचे सुत title=

मुंबई : बॉलीवूड अभिनेता विकी कौशलचा भाऊ सनी कौशल आणि कतरिना कैफची बहीण इसाबेल कैफ यांच्याबद्दल एक मनोरंजक बातमी वाऱ्यासारखी पसरत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दोघांमध्ये फिल्मी रोमान्स सुरू आहे. मात्र, आश्चर्याची गोष्ट म्हणजे इसाबेल आणि सनीने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. या दोघांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे अशा प्रकारच्या अटकळ सुरु झाल्या आहेत.  

सनी कौशल आणि इसाबेलचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये दोघंही एकमेकांसोबत डिनर एन्जॉय केल्यानंतर पापाराझीसाठी पोज देताना दिसत आहेत. व्हिडिओमध्ये सनी कौशल निळ्या रंगाचा शर्ट आणि जीन्समध्ये तर इसाबेलने ब्लॅक स्कर्ट आणि डेनिम टॉप घातला होता. कारमध्ये बसण्यापूर्वी दोघांनी एकत्र फोटोंसाठी पोजही दिल्या. या व्हिडिओनंतर अशा अफवा पसरत आहेत की दोघेही एकमेकांना डेट करत आहेत.  

सनीचे नाव यापूर्वी अभिनेत्री शर्वरी वाघसोबत जोडलं गेलं होतं. मात्र, आता कतरिना कैफचा दिर अभिनेत्रीची बहीण इसाबेल हिला डेट करत असल्याच्या बातम्या येत आहेत. या व्हिडिओवर कमेंट करताना अनेक सोशल मीडिया यूजर्स असेच प्रश्न विचारत आहेत. मात्र, सनी आणि इसाबेलने डेटिंगच्या अफवांवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

वास्तविक, दोघांच्या बाँडिंगमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. रविवारी रात्री दोघंही वांद्रे येथे एका पार्टीत पोहोचले होते. दोघंही एकाच कारमध्ये आले आणि कपलसारखे एकत्र फोटो क्लिक करु लागले. सनी आणि इसाबेल दोघेही अभिनयाच्या दुनियेत आहेत. विकी आणि कतरिना कैफमुळे दोघांची ओळख अधिक झाली असली तरी. एकत्र दिसल्यानंतर सोशल मीडियावर लोक विचारत आहेत की त्यांनी डेटिंग सुरू केली आहे का?

विकी आणि कतरिनाचं २०२१ मध्ये लग्न झालं. तेव्हापासून इसाबेल आणि सनी यांच सुत जुळली असल्याचं बोललं जातय. सनी आणि इसाबेल अनेकदा एकत्र दिसले आहेत. मात्र, अशा प्रकारे दोघेही पहिल्यांदाच पार्टीत एकत्र दिसले आहेत. त्यानंतर दोघांच्या अफेअरची चर्चा आहे. दोघांनीही यावर काहीच प्रतिक्रीया दिलेली नाही.  

अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री कतरिना कैफ यांचं नातं अनेकांसाठी आश्चर्याचा धक्काच होतं. कारण, बऱ्याच वर्षांपूर्वी हिंदी कलाजगतामध्ये कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या कतरिनाच्या आयुष्यात त्याचं येणं पूर्णपणे अनपेक्षित. त्याहूनही त्यांचं एकमेकांच्या प्रेमात पडणं आणि या प्रेमाच्या नात्याला लग्नाचं नाव देणं याची क्वचित मित्रमंडळी वगळता इतर कोणालाही कल्पनाच नव्हती. हो, पण विकी आणि कतरिनाच्या चाहत्यांना मात्र या जोडीनं लग्नाच्या निर्णयानं प्रचंड आनंद झाला होता.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x