'गोलमाल अगेन'चा डायलॉग प्रोमो रिलीज

बॉलिवूड स्टार अजय देवगण, तुषार कपूर, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तब्बू आणि परिणिती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित 'गोलमाल ४'चा डयलॉग प्रोमो रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे काही पोर्स्टर्स आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. दरम्यान, डायलॉग प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.

Updated: Oct 14, 2017, 11:00 AM IST
'गोलमाल अगेन'चा डायलॉग प्रोमो रिलीज title=
छायाचित्र सौजन्य - यूट्यूब

मुंबई : बॉलिवूड स्टार अजय देवगण, तुषार कपूर, आर्शद वारसी, श्रेयस तळपदे, तब्बू आणि परिणिती चोप्रा अशी तगडी स्टारकास्ट असलेला बहुचर्चित 'गोलमाल ४'चा डयलॉग प्रोमो रिलीज झाला आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपटाचे काही पोर्स्टर्स आणि ट्रेलर रिलीज करण्यात आले होते. दरम्यान, डायलॉग प्रोमोही रिलीज करण्यात आला आहे.

रिलिज झालेल्या चित्रपटाच्या ट्रेलरमध्येच ही गोष्ट स्पष्टपणे सांगितली होती की या दिवाळीला 'लाजिक नव्हे तर, फक्त मॅजिक' आणि आता डायलॉग प्रोमो पाहून तुम्ही समजालच की या चित्रपटासाठी ही टॅगलाईन का दिली होती. आगोदरच्या गोलमाल प्रामाणे हा गोलमालही तितकाच धमाल करणारा असणार आहे असे दिसते.

दरम्यान, 'गोलमाल' मालिकेतील हा चौथा चित्रपट आहे. रोहित शेट्टी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. परिणीती चोप्रा आणि तब्बू गोलमालच्या माध्यमातून पहिल्यांदाच रोहित शेट्टीच्या दिग्दर्शनाखाली काम करत आहेत. हा चित्रपट येत्या २० ऑक्टोबरला रिलीज होत आहे.

'गोलमाल४' मधले काही डायलॉग

"आ रहा है वह... 100% तुम सबको सूली पर चढ़ाएगा, 200% तुम सबको शमशान पहुंचाएगा, 300% तुम सबको साफ कर देगा"

"किस बात से डर रहा है यार... एज डिफ्रेंस... हर लड़की है न अपने होने वाले में फादर फिगर ढूंढती है, फिगर उसके पास है फादर तू है"