मुंबई : शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत हिचं आपल्या सासरच्या सदस्यांशी असलेलं प्रेमळ नातं अनेकदा दिसून आलंय. खासकरून मीराचं आपल्या दिराशी अर्थातच 'धडक' फेम अभिनेता ईशान खट्टर याच्याशी खूप चांगलं बाँन्डिंग आहे. ईशान आणि मीरा अनेकदा मीडियासमोरही दिसले आहेत. परंतु, नुकताच समोर आलेल्या एका व्हिडिओ पाहून त्यांच्या चाहत्यंना धक्का बसत आहे. सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या मीरानेच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता.
समोर आलेल्या या व्हिडिओमध्ये शाहिदची पत्नी त्याच्या दिराच्या म्हणजेच ईशानच्या कानाखाली लगावताना दिसतेय. अवघ्या काहीच वेळात हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अनेकजण यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करताना दिसत आहेत. या व्हिडिओचं संपूर्ण दृश्य लोकांचं लक्ष वेधून घेत आहे. मीरा अनेकदा तिच्या मजेदार कंटेंटने चाहत्यांना व्हिज्युअल ट्रीट देताना दिसते.
मीरा राजपूतने इशानच्या कानशिलात लगावली
शाहिद कपूरने त्याचं अधिकृत इंस्टाग्राम अकाउंट अपडेट करत एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये अभिनेता पत्नी मीरा राजपूत आणि भाऊ ईशान खट्टरसोबत सोफ्यावर बसून चहाचा आनंद घेत असतात मात्र, तेवढ्यात काहीतरी घडतं ज्यामुळे ईशान आणि मीरामध्ये वाद होतो. गोष्टी वाढतात आणि मीरा ईशानला कानाखाली लगावते. यानंतर तिघंही जोर-जोरात हसू लागतात.
'दिल चाहता है'चा सीन पुन्हा केला रिक्रेएट
ईशान, शाहिद आणि मीरा यांनी मिळून 'दिल चाहता है' चित्रपटाचा सीन रिक्रेएट करतात. नंतर, त्यांचा हा व्हिडिओ चाहत्यांचं मन जिंकत आहे. हा अप्रतिम कौटुंबिक व्हिडिओ समोर येताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अवघ्या काही वेळातच या व्हिडिओला 3 लाख 77 हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.
बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि पत्नी मीरा राजपूत बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध असलेल्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. शाहिद आणि मीरा २०१५ मध्ये लग्नबंधनात अडकले. आता हे दोघे दोन मुलांचे आई-वडील आहेत. शाहिद-मीरा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमातून एकत्र पाहायला मिळतात.