Miss Universe 2109 : बिकीनी राऊंडमध्ये सौंदर्यवतीचा तोल गेला अन्....

तोल जाऊनही आत्मविश्वास कायम 

Updated: Dec 10, 2019, 03:15 PM IST
Miss Universe 2109 : बिकीनी राऊंडमध्ये सौंदर्यवतीचा तोल गेला अन्....

मुंबई : 'मिस युनिवर्स 2019' Miss Universe 2109 चा किताब साऊथ आफ्रिकेची South Africa झोजिबीनी टुंझीने Zozibini Tunzi  जिंकला आहे. झोजिबीनी टुंझीने 90 सौंदर्यवतींना हरवून मिस युनिवर्स 2019 चा किताब जिंकला आहे. या स्पर्धेत बिकीनी राऊंड देखील झाला होता. या दरम्यान रॅम्प वॉक करताना अनेक स्पर्धक सौंदर्यावतींचा तोल गेला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

मात्र असं असलं तरीही या स्थितीला सर्व सौंदर्यवतींनी खूप चांगल्याप्रकारे सांभाळलं. तोल गेल्यानंतर या सौंदर्यवती हसल्या, टाळ्या वाजवत उठल्या आणि तेथून निघून गेल्या. दर्शकांनी देखील त्या सौंदर्य स्पर्धकांचा उत्साह वाढवला. या दरम्यानचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (...'या' प्रश्नाचं उत्तर देत ती ठरली Miss Universe 2019) 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 

A post shared by Maëva Coucke (@maevacouckeoff) on

या व्हिडिओत आपण पाहू शकतो की, अनेक स्पर्धक रॅम्प वॉक करताना दिसत आहेत. यामध्ये मिस फ्रान्स माएवा कूचचा देखील सहभाग होतो. या वॉकच्या नंतर माएवाने रॅम्प वॉक करतानाचा तोल गेल्याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. या दरम्यान माएवाचा आत्मविश्वास कुठेही कमी होताना दिसला नाही. 

माएवाने आपला व्हिडिओ शेअर करताना लिहिलं आहे की, तिला या घटनेनंतर एक मोठी शिकवण मिळाली आहे. तसेच पडून उठणं हेच तर महिलांच्या जीवनातील महत्वाचा सार आहे. स्पर्धेत रॅम्प वॉक ओलं असल्यामुळे ती घटना घडली. कारण सगळ्या स्पर्धक एकाच ठिकाणी घसरल्या. 

अमेरिकेच्या अटलांटामध्ये रविवारी 68 वे मिस युनिवर्स सोहळा संपन्न झाला. यावेळी 90 सौंदर्यवतीमध्ये ही स्पर्धा होती. यामध्ये भारताची वर्तिका सिंह देखील सहभागी झाली होती. वर्तिकाने टॉप 20 मध्ये आपली जागा निश्चित केली आहे.