विजय बाबूविरोधात पोलिसांकडून 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी

केरळ पोलिसांनी अभिनेता-निर्माता विजय बाबूविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे.

Updated: May 6, 2022, 03:41 PM IST
विजय बाबूविरोधात पोलिसांकडून 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी   title=

मुंबई : केरळ पोलिसांनी अभिनेता-निर्माता विजय बाबूविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस जारी केली आहे. केरळ पोलिसांनी गुरुवारी सांगितलं की, बलात्काराचा आरोप असलेला मल्याळम अभिनेता-निर्माता विजय बाबू याच्याविरुद्ध 'ब्लू कॉर्नर' नोटीस जारी करण्यात आली आहे. कोची शहराचं पोलिस आयुक्त सी.एच. विजय बाबूला लवकरात लवकर परत आणण्यासाठी सगळी पावलं उचलली जातील असं नागराजू म्हणाले.

खरंतर, महिला सहकाऱ्याने विजय बाबूवर बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर निर्माते बेपत्ता होतं. या प्रकरणी कोची पोलिसांनी अभिनेत्याविरुद्ध लूक आऊट नोटीसही जारी केली होती. आता बाबू देशातून पळून गेला असून तो सध्या संयुक्त अरब यूएई असल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममधील कोझिकोड येथील एका महिला सहकाऱ्याने तक्रार दाखल केल्यानंतर बाबू फरार झाला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एर्नाकुलममध्ये 22 एप्रिल रोजी कोझिकोडमधील एका महिला फिल्म असोसिएटने विजय बाबू यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. त्यात असं म्हटलं होतं की, कोचीमधील एका फ्लॅटमध्ये तिच्यावर अनेकदा बलात्कार आणि मारहाण करण्यात आली. या महिलेने अभिनेत्यावर लैंगिक शोषण करण्यापूर्वी नशा केल्याचा आरोपही केला आहे.

बातमी पसरल्यानंतर लगेचच, बाबू त्याच्या सोशल मीडिया हँडलवर लाइव्ह दिसला आणि दावा केला की, या प्रकरणात तो "खरा बळी" आहे आणि तो तक्रारदाराविरुद्ध योग्य कायदेशीर पावलं उचलेल. तक्रारदाराचं नाव उघड केल्याबद्दल पोलिसांनी अभिनेत्यावर दुसरा गुन्हा देखील दाखल केला आहे.

बाबूने फरार असताना अटकपूर्व जामीन याचिका दाखल केली होती. मात्र केरळ उच्च न्यायालयाने त्याच्यावर विश्वास ठेवला नाही आणि प्रकरणाची सुनावणी 18 मे पर्यंत पुढे ढकलली.