Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था!

Vijay Deverakonda हा Rashmika Mandanna हे दोघे रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा आहेत. दरम्यान, त्या दोघांनी या बातमीवर अजून दुजोरा दिलाला नाही. 

Updated: Jan 5, 2023, 06:04 PM IST
Vijay Deverakonda सोबत Kissing सीन दिल्यानंतर अशी होती Rashmika Mandanna ची अवस्था! title=

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna First Kiss: दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनेता विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) त्यांच्या रिलेशनशिपच्या बातम्यांमुळे गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहेत. त्या दोघांचे अनेक फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण पाहतो. मात्र, विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदाना यांनी अजून या बातमीवर दुजोरा दिलेला नाही. काही दिवसांपूर्वी त्या दोघांचा मालदीवमधला एक फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा पुन्हा एकदा सुरु झाल्या. दरम्यान, आता रश्मिकाचा मुलाखतीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या मुलाखतीत रश्मिका ही तिच्या आणि विजयसोबतच्या किसिंग सीनविषयी बोलताना दिसली. रश्मिकानं जेव्हा पहिल्यांदा विजयसोबत किसिंग सीन दिला तेव्हा तिला काय वाटले याविषयी तिनं सांगितले आहे. 

या किसिंग सीनवर रश्मिका म्हणाली, तिला खूप अडचणींचा सामना करावा लागला होता. हे तिच्यासाठी खूप वेदनादायक होते. यावर रश्मिका म्हणाली होती की ती खूप इमोशनल व्यक्ती आहे. यातून कसे बाहेर पडावे, त्याचा सामना कसा करायचा हे तिला कळत नव्हते. कारण तिला या सीनवरून सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल करण्यात आले होते. रश्मिकाने मुलाखतीत सांगितले होते की, किसिंग सीनमुळे ती खूप ट्रोल झाली होती. लोकांनी तिला खूप वाईट म्हटले होते. हे तिच्यासाठी खूप वेदनादायक होते. ती अनेक महिने रडत होती. झोपून उठली की ती रडू लागायची.  

हेही वाचा : शाहरुख ची लेक Suhana Khan होणार बच्चन फॅमिलीची सून?

रश्मिका आणि विजय यांचा 'डियर कॉम्रेड' हा चित्रपट 2019 साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाच्या स्क्रिप्टच्या डिमांडमुळे किसींग सीन शूट करण्यात आला होता. त्याला पाहून प्रेक्षकांनी त्याला अश्लील असल्याचे म्हटले. तर अनेकांनी त्याला किसिंग सीन अश्लील असून त्या दोघांना प्रसिद्धीची भूक असल्याचे म्हटले होते. 

रश्मिका आणि विजय देवरकोंडा हे दोघे पहिल्यांदा 'गीता गोविंदम' चित्रपटात दिसले होते. यानंतर दोघेही 'डियर कॉम्रेड'मध्ये दिसले. यानंतर नुकतीच बातमी अशी होती की दोघे लवकरच लग्न बंधनात अडकणार आहेत. मात्र, अभिनेत्रीने या सगळ्या अफवा असल्याचे म्हटले आहे, सध्या रश्मिका  बॉलिवूडमध्ये काम करत असून 'मिशन मजनू' हा तिचा आगामी चित्रपट 20 जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात ती अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत दिसत आहे. याशिवाय ती अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' या चित्रपटात देखील दिसणार आहे. रश्मिका लवकरच रणबीर कपूरसोबत 'अॅनिमल' या चित्रपटात दिसणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेता थलपथी विजयसोबत 'वारिसू' या चित्रपटात स्क्रिन शेअर करणार आहे.