एकेकाळी पैशाची चणचण असणारा अभिनेता विजय देवराकोंडा आहे चक्क इतक्या संपत्तीचा मालक; ऐकून बसेल धक्का

साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा 33 वर्षांचा झाला आहे.

Updated: May 9, 2022, 04:11 PM IST
एकेकाळी पैशाची चणचण असणारा अभिनेता विजय देवराकोंडा आहे चक्क इतक्या संपत्तीचा मालक; ऐकून बसेल धक्का title=

मुंबई : साऊथ सुपरस्टार विजय देवरकोंडा 33 वर्षांचा झाला आहे. त्यांचा जन्म 9 मे 1989 रोजी हैद्राबाद येथे झाला. विजयने आपल्या 11 वर्षांच्या करिअरमध्ये अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केलं. मात्र, त्याला सर्वाधिक ओळख अर्जुन रेड्डी या चित्रपटातून मिळाली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली होती.

नंतर याच चित्रपटाचा हिंदी रिमेक बनवण्यात आला. ज्यामध्ये शाहिद कपूर मुख्य भूमिकेत होता. या चित्रपटाची हिंदी आवृत्तीही ब्लॉकबस्टर ठरली होती. विजयच्या वैयक्तिक आयुष्याविषयी बोलायचं झालं तर तेही खूप मनोरंजक आहे. ते आज करोडोंच्या मालमत्तेचे मालक आहेत. पण त्याच्या आयुष्यात एकवेळ अशी आली होती जेव्हा त्याच्याकडे घरभाडं भरण्यासाठीही पैसे नव्हते.

विजय देवराकोंडा त्याच्या स्टायलिश लूक आणि ऑनस्क्रीन उपस्थितीसाठी खूप प्रसिद्ध आहे. त्याच्या छोट्याशा कारकिर्दीतही त्याने आपली जबरदस्त फॅन फॉलोइंग कायम ठेवली आहे. त्याचा चित्रपट पाहण्यासाठी चाहते नेहमीच वेडे असतात.

आम्ही तुम्हाला सांगतो की, विजय देवरकोंडा हे पुढील पॅन इंडिया स्टार आहेत. तो त्याच्या आगामी 'लाइगर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटात जगन्नाथ पुरी अनन्या पांडे  सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे.

जगभरात प्रसिद्ध बॉक्सर माइक टायसन देखील विजय देवरकोंडा यांच्या 'लाइगर' चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाची निर्मिती करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने केली आहे. हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे.

विजय देवरकोंडाच्या जीवनशैलीबद्दल सांगायचं झालं तर, त्याने सुरुवातीच्या काळात खूप संघर्ष केला आहे. एवढंच नाही तर त्याला आर्थिक चणचणही सहन करावी लागली आहे. त्याचबरोबर, जर आपण आज बोललो तर तो सुमारे 30 कोटींच्या मालमत्तेचा मालक आहे.

विजय देवरकोंडाचं वार्षिक उत्पन्न सुमारे 6 कोटी रुपये आहे. चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच तो त्याच्या नफ्यातही वाटा उचलतो. चित्रपटांव्यतिरिक्त, तो ब्रँड एंडोर्समेंटमधून देखील भरपूर कमाई करतो. यासाठी तो भरमसाठ फी देखील घेतो.

रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडा एका चित्रपटासाठी 5 ते 7 कोटी घेतो. त्याचबरोबर त्याला 'लाइगर' चित्रपटासाठी 20 कोटी रुपये मानधन मिळालं आहे. हैद्राबाद ज्युबली हिलवर त्याचा एक आलिशान बंगला आहे. ज्याची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे.

विजय देवराकोंडा हा कारचा शौकीन असून त्याच्याकडे अनेक आलिशान गाड्या आहेत. त्याच्याकडे मर्सिडीज बेंझ, ऑडी, मर्सिडीज अशी अनेक वाहनं आहेत. या वाहनांची किंमतही करोडोंमध्ये आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विजय देवरकोंडा याला अर्जुन रेड्डी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.