शाहरुख खानची लेक क्रिकेटर रिंकू सिंहबरोबर फिरायला गेली? समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंमागचं सत्य काय?

Suhana Khan & Rinku Singh Photo: सोशल मीडियावर मागील काही दिवसांपासून भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि अभिनेत्री सुहाना खानचे काही फोटो व्हायरल झाल्याचं पाहायला मिळत आहे. या फोटोंमागील सत्य समोर आलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jan 30, 2025, 08:50 AM IST
शाहरुख खानची लेक क्रिकेटर रिंकू सिंहबरोबर फिरायला गेली? समुद्रकिनाऱ्यावरील फोटोंमागचं सत्य काय? title=
हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत (फोटो सौजन्य सोशल मीडियावरुन साभार)

Suhana Khan & Rinku Singh Photo: भारतीय संघातील मधल्या फळीतील फलंदाज रिंकू सिंह सध्या चांगलाच चर्चेत आहे. समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज आणि रिंकूचा विवाह होणार असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. या दोघांच्या नातेवाईकांनाही घरातील वरिष्ठ लोकांची चर्चा झाल्याचं सांगितलं आहे. हे नातं जवळपास निश्चित मानलं जात आहे. असं असतानाच सध्या सोशल मीडियावर बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानची मुलगी तसेच अभिनेत्री सुहाना खान आणि रिंकू सिंहचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. सोशल मीडियावर अनेकांनी सुहाना आणि रिंकूचे फोटो शेअर केले असून या फोटंची चांगलीच चर्चा दिसून येत आहे.

फोटोंमध्ये आहे तरी काय?

या फोटोंमध्ये रिंकू हा शर्टलेस असून सुहाना सुद्धा बीचवर परिधान करतात तशा कपड्यांमध्ये दिसत आहे. हे दोघेही सुट्ट्यांसाठी एकत्र भटकंती करत आहेत, असा दावा करण्यात येत आहे. दोघेही एकत्र सुट्ट्यांचा आनंद घेत असल्याचा दावा करण्यात आला आहे. समुद्रकिनाऱ्यावर रिंकू आणि सुहाना बाजूबाजूला बसले असून दोघेही हसताना दिसत आहेत. केवळ फेसबुकच नाही तर इन्स्टाग्राम आणि एक्स (आधीच्या ट्वीटरवरही) हे फोटो चर्चेत आहेत. मात्र या फोटोंबद्दल आणि त्यासंदर्भात केल्या जात असलेल्या दाव्यांबद्दलचं सत्य समोर आलं आहे. रिंकूच्या नावाने चालवल्या जाणाऱ्या फॅन पेजेसवरुनही हे फोटो शेअर करण्यात आलेत.

दोघे एकमेकांना कसे ओळखतात

खरं तर रिंकू सिंह हा आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाकडून खेळतो. हा संघ शाहरुख खानच्या मालकीचा आहे. शाहरुख आणि त्याचे कुटुंबिय अनेकदा केकेआरचे सामने पाहण्यासाठी मैदानात दिसतात. यावेळेस शाहरुखबरोबर सुहानाही असते. त्यामुळेच सुहाना आणि रिंकू हे एकमेकांना छान ओळखतात आणि ते फिरायला गेलेत असा दावा केला जात आहे. मात्र या दोघांचे समुद्रकिनाऱ्यांवरील फोटो हे खरे नसून आर्टिफिशीअल इंटेलिजन्स म्हणजेच एआय तंत्रज्ञान वापरुन बनवण्यात आले आहेत. 

फोटोंमगील सत्य काय?

हे फोटो कोणत्याही विश्वासार्ह खात्यांवरुन शेअर करण्यात आलेले नाही. तसेच अनेक एआय इमेज डिटेक्शन वेबसाईटवरही हे फोटो एआयवर बनवण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 'हाइव्ह मॉडरेशन' नावाच्या वेबसाईटने तर या फोटोंमधील 99.8 टक्के भाग हा एआय जनरेटेड असून यामध्ये डिपफेक कंटेट वापरण्यात आल्याचं म्हटलं आहे. 'साइटइंजिन' या वेबसाईटनेही सदर फोटोमधील 99 टक्के भाग हा एआय वापरुन तयार करण्यात आल्याचं म्हटलं आहे. स्टॅब डिफ्युजन या स्टॅबिलीट एआयच्या मदतीने हे फोटो तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 'वॉज इट एआय' या वेबसाईटनेही सदर फोटोंपैकी बराचसा भाग हा एआयवरुन बनवण्यात आला आहे असं सांगितलं आहे. 

सत्य काय?

त्यामुळेच रिंकू आणि सुहाना एकत्र सुट्ट्यांवर गेल्याचा दावा खोटा असल्याचं सिद्ध होत असून ही चुकीची माहिती एआय फोटोंच्या मदतीने पसरवली जात आहे.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x