दीपिकानंतर विजय माल्याचा मुलगा 'या' मुलीच्या प्रेमात, गुपचूप उरकला साखरपुडा

Vijay Mallya's son Sidhartha gets engaged :  विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यानं नुकतंंच गर्लफ्रेंडसोबत गुपचूप साखरपुडा उरकला आहे. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत त्यानं खुलासा केला आहे. 

दिक्षा पाटील | Updated: Nov 2, 2023, 05:29 PM IST
दीपिकानंतर विजय माल्याचा मुलगा 'या' मुलीच्या प्रेमात, गुपचूप उरकला साखरपुडा title=
(Photo Credit : Social Media)

Vijay Mallya's son Sidhartha gets engaged : विजय माल्याचा मुलगा सिद्धार्थ माल्यानं हॅलोवीन 2023 मध्ये एका हटके अंदाजात त्याची गर्लफ्रेंड जॅस्मीला प्रपोज केलं आहे. सिद्धार्थनं काल सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत यावषयी माहिती दिली आहे. या निमित्तानं त्याच्या चाहत्यांनी त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं शेअर केलेली ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्या दोघांचा लूक हा चर्चेचा विषय ठरत आहे. 

सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत सिद्धार्थनं दोन फोटो शेअर केले आहेत. एका फोटोत सिद्धार्थ त्याची गर्लफ्रेंड जॅस्मिला प्रपोज करताना दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत त्यानं जॅस्मिनच्या हातात असलेली अंगठी दाखवताना दिसत आहे. त्या दोघांनीही हॅलोवीन-थीम असलेले ड्रेस परिधान केले आहेत. हे फोटो शेअर करत सिद्धार्थ म्हणाला, 'आता तू माझ्यासोबत आयुष्याभरासाठी अडकली आहेत. आय लव्ह यू माय जुपेट. (या भोपळ्याला हो बोलण्यासाठी धन्यवाद.)' 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

सिद्धार्थ आणि जॅस्मिनचा हा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. यात फक्त चाहते नाहीत तर अनेक सेलिब्रिटी आहेत. सोफीया चौधरीनं त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. तर हृतिकची एक्स वाईफ सुझैन खाननं त्यांना शुभेच्छा देत कमेंट केली की 'शुभेच्छा ही खूप गोड बातमी आहे.' अनुषा दांडेकरनं हटके कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिली आहे. अनुषा म्हणाली, 'सिम्बाला त्याची आयुष्यभरासाठी नाला भेटली.' कतरिना कैफची बहीण इसाबेलनं देखील यावर कमेंट केली आहे. इसाबेल म्हणाली की 'खूप शुभेच्छा!'

हेही वाचा : सनी देओलला नाही आवडत शाहरुख खानची 'ही' गोष्ट, सलमान- अक्षयचा उल्लेख करत म्हणाला...

सिद्धार्थचा जन्म लॉस एंजिलिस, कॅलिफोर्नियामध्ये झाला आणि तो लंडन आणि संयुक्त अरब अमीरातमध्ये लहाणाचा मोठा झाला. त्यानं वेलिंगटन कॉलेज आणि लंडनच्या क्वीन मॅरी यूनिव्हर्सटीमधून शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर रॉयल सेंट्रल स्कूल ऑफ स्पीच एंड ड्रामामध्ये अॅडमिशन घेत त्यानं पुढचं शिक्षण पूर्ण केलं. सिद्धार्थ माल्या हा एक अभिनेता आणि मॉडेल आहे. त्यानं अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केलं आहे. त्यापैकी एक म्हणजे सेक्स कॉमेडी चित्रपट ब्राह्मण नमन देखील आहे. त्यानं ऑनलाइन व्हिडीओ शो होस्ट केला होता. याशिवाय गिनीजसाठी मार्केटिंग मॅनेजर म्हणून देखील काम केले आहे. सिद्धार्थचे वडील विजय माल्या हे यूबी ग्रुप केचे अध्यक्ष आहेत.  हा एक भारतीय ग्रुप आहे, ते मादक पदार्थ बनवण्याचा व्यवसाय करतात.  दरम्यान, सिद्धार्थ आणि दीपिका कधी काळी रिलेशनशिपमध्ये होते. त्यांचे अनेक फोटो सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरले होते.