Gold Reserve In India : सोन्यातील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाते. जगभरात अनेक देशातील लोक हे सोन्यामध्ये गुंतवणूक करतात. भारतात सर्वात जास्त सोनं कुणाकडे आहे ते माहित आहे का? भारतात असे काही लोक आहेत ज्यांच्याकडे तब्बल 24 हजार टन सोनं आहे. हे सोनं जगातील एकूण 11 टक्के इतके आहे.
सोने आयात करणाऱ्या देशांमध्ये भारत हा जगातील चौथ्या क्रमांकाचा देश आहे. गेल्या वर्षी भारतातील सोन्याची आयात 21.78 टक्क्यांनी वाढली आहे. 2024 च्या पहिल्या सहामाहीत भारतातील सोन्याची आयात 21.78 टक्क्यांनी वाढली आहे. भारतीय महिलांनी दागिन्यांच्या रूपात साठवलेले सोने हे जगातील एकूण सोन्याच्या 11 टक्के इतके आहे. वर्ल्ड गोल्ड काउंसिलने दिलेल्या आकडेवारीनुसार भारतीय महिलांकडे एकूण २४,००० टन सोने आहे. भारतातील दागिन्यांच्या स्वरूपात असलेले अफाट सोने हे जगातील पहिल्या पाच देशांच्या एकत्रित सोन्याच्या साठ्यापेक्षा जास्त आहे. भारतीय महिला सोन्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंकवणूक करतात. भारतात लग्नातही मोठ्या प्रमाणात सोन्याची देवाण घेवाण केली जाते. यामुळे भारतात सोनं एका पिढीपासून दुसऱ्या पिढीला देण्याची देखील मोठी परंपरा आहे.
ऑक्सफर्ड गोल्ड ग्रुपच्या अहवालानुसार, भारतातील इतर भागांच्या तुलनेत दक्षिण भारतीय कुटुंबातील महिलांकडे सोन्याचे दागिने सर्वाधिक आहेत. सोन्याच्या मालकीच्या बाबतीत, भारतातील एकूण सोन्यापैकी 40 टक्के सोनं दक्षिण भारतातील महिलांकडे आहे. यापैकी 28 टक्के सोनं एकट्या तामिळनाडू राज्यात आहे. हे सोनं अमेरिका, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF), स्वित्झर्लंड आणि जर्मनीच्या एकत्रित साठ्यापेक्षा जास्त आहे.
वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या 2020-21 च्या अभ्यासानुसार, भारतीय कुटुंबांतील महिलांनी 21,000 ते 23,000 टन सोने आहे. 2023 पर्यंत हे सोनं 24,000 ते 25,000 टन किंवा 25 दशलक्ष किलोग्रॅम सोन्यापेक्षा जास्त आहे. भारतीय महिलांकडे असलेला सोन्याचा साठा देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या 40 टक्के इतका आहे.
अमेरिका, जर्मनी, इटली, फ्रान्स आणि रशिया या जगातील पहिल्या पाच देशांच्या तुलनेत सोन्याच्या दागिन्यांच्या स्वरूपात सोन्याचा सर्वाधिक साठा भारताकडे आहे. सध्या अमेरिकेकडे 8,000 टन, जर्मनीकडे 3,300 टन, इटलीकडे 2,450 टन, फ्रान्सकडे 2,400 टन आणि रशियाकडे 1,900 टन सोन्याचा साठा आहे.