मानधनाच्या बाबतीत 'हा' दाक्षिणात्य अभिनेता रणबीर, रणवीरलाही टाकतोय मागे, आकडा एकदा पाहाच...

जाणून घ्या कोण आहे हा अभिनेता...  

Updated: Aug 29, 2022, 09:56 AM IST
मानधनाच्या बाबतीत 'हा' दाक्षिणात्य अभिनेता रणबीर, रणवीरलाही टाकतोय मागे, आकडा एकदा पाहाच... title=

मुंबई : बॉलिवूडचा किंग खान अभिनेता शाहरुख खानच्या (Shahrukh Khan) 'जवान' (Jawan) या अॅक्शन चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाल्यापासून चाहत्यांना या चित्रपटाची प्रचंड उत्सुकता आहे. सतत चर्चेत असलेल्या या चित्रपटात तमिळ सुपरस्टार विजय सेतुपतीही (Vijay Sethupathi) नकारात्मक भूमिकेत दिसणार आहे. अॅटली दिग्दर्शित या चित्रपटात दक्षिणात्य सुपरस्टार नयनताराही महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

रिपोर्ट्सनुसार, विजय सेतुपतीनं या चित्रपटात काम करण्यासाठी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली आहे. ही रक्कम इतकी जास्त आहे की विजयनं आतापर्यंत कोणत्याही चित्रपटासाठी इतकी मोठी रक्कम मानधन म्हणून घेतली नसेल. काही रिपोर्ट्सनुसार, विजय सेतुपतीनं 'जवान'मध्ये काम करण्यासाठी 21 कोटी रुपये मानधन म्हणून घेतले आहेत. यापूर्वी विजयनं त्याच्या मागील चित्रपटासाठी 15 कोटी रुपये घेतले होते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

विजयनं त्याची फी अचानक वाढवली नाही. खरंतर, नुकताच प्रदर्शित झालेल्या कमल हासनच्या (Kamal Hasan) 'विक्रम' (Vikram) चित्रपटातील विजयच्या अभिनयाचं खूप कौतुक झालं आहे. 'जवान'साठी विजयनं आणखी दोन चित्रपटांना नकार दिल्याचेही म्हटले जात आहे. या चित्रपटातील विजयची व्यक्तिरेखा इतकी महत्त्वाची आहे की, त्याकडे दुर्लक्ष करता येत नाही. या चित्रपटात विजय हा मुख्य खलनायक असेल.

यापूर्वी, काही रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की, शाहरुख आणि अॅटली दोघेही विजय सेतुपतीला कास्ट करण्यासाठी खूप उत्सुक होते. याआधी राणा दग्गुबती (Rana Daggubati) या भूमिकेत दिसणार होता पण प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यानं या चित्रपटासाठी नकार दिला होता. शाहरुख आणि विजय दोघांनाही एकमेकांबद्दल खूप आदर आहे. शाहरुखनंच 'जवान'साठी विजय सेतुपतीशी बोलल्याचे म्हटलं जात आहे.

'जवान' हा एक पॅन इंडिया चित्रपट असेल जो हिंदी व्यतिरिक्त तामिळ, तेलगु, कन्नड आणि मल्याळम भाषेत प्रदर्शित होईल. हा चित्रपट 200 कोटींच्या मोठ्या बजेटमध्ये बनवला जात आहे. शाहरुख, विजय आणि नयनतारा व्यतिरिक्त या चित्रपटात दीपिका पदुकोण (Deepika Padukone), सान्या मल्होत्रा (Sanya Malhotra) ​​आणि सुनील ग्रोव्हर (Sunil Grover) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.