'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार!

Vijay Sethupathi Said No On Working with This Actress : विजय सेतुपतीनं या लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत काम करण्यास थेट नकार दिला होता. 

दिक्षा पाटील | Updated: Jun 3, 2024, 04:05 PM IST
'तिच्यासोबत केमिस्ट्री निव्वळ अशक्य', 'या' अभिनेत्रीसोबत काम करण्यास विजय सेतुपतीचा स्पष्ट नकार! title=
(Photo Credit : Social Media)

Vijay Sethupathi Said No On Working with This Actress : लोकप्रिय दाक्षिणात्य अभिनेता विजय सेतुपतीला कोणत्याही ओळखीची गरज नाही. त्यानं स्वत: चं चित्रपटसृष्टीत स्थान निर्माण केलं आहे. सगळ्यात आधी एक खलनायक म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. विजयनं चित्रपटसृष्टीत येईन हे सिद्ध केलं की फक्त एक अभिनेता नाही तर खलनायक देखील लोकप्रियतेच्या शिखरावर जाऊ शकतो. त्याशिवाय जवानमधील त्याची काली गायकवाड ही भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. दरम्यान, आता तो चर्चेत आला आहे त्याचं कारण हे आहे की विजयनं एका अभिनेत्रीसोबत काम करण्यास नकार दिला आहे. जाणून घेऊया त्या मागचं नक्की कारण काय आहे.

सध्या विजय सेतुपतिचा एक जुना व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यात त्यानं  लोकप्रिय लोकप्रिय अभिनेत्री क्रिती शेट्टीसोबत काम करण्यास नकार दिला. ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा क्रितीनं तिच्या करिअरची सुरुवात केली होती. तिचा पहिलाच चित्रपट होता हा ‘उप्पेना’ होता. त्यात तिच्यासोबत विजय सेतुपती होता ज्यानं तिच्या वडिलांची भूमिका साकारली होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

विजय सेतुपतिनं क्रितीशी संबंधीत किस्सा हा लाभम या चित्रपटा दरम्यान सांगितला होता. त्यानं सांगितलं की एक चित्रपट निर्माता त्याला आणि क्रिती शेट्टीला घेऊन चित्रपट बनवणार होता. पण विजय सेतुपतिला क्रितीसोबत त्याची जोडी ही खटकत होती. त्याचं कारण म्हणजे क्रितीनं त्याच्या मुलीची भूमिका साकारली होती. त्या दोघांमध्ये असलेल्या वयाचा फरकामुळए विजय सेतुपति क्रितीला देखील खऱ्या आयुष्यात मुलगी मानतो. त्यामुळे त्यानं तिच्यासोबत ऑनस्क्रीन रोमान्स करण्यास स्पष्ट नकार दिला. त्यानंतर विजय सेतुपतिसोबत त्या चित्रपटात श्रुती हासनला कास्ट करण्यात आलं. हा किस्सा  ‘लाभम’ च्या शूटिंगच्या दरम्यानचा आहे. या चित्रपटाच्या निर्मात्यांना त्या दोघांना म्हणजेच विजय आणि क्रितीला एकत्र कास्ट करायचं होतं. 

हेही वाचा : 'कधीपर्यंत तरुण राहशील?' 43 वर्षांच्या श्वेता तिवारीचा लूक पाहून चाहते घायळ

विजयनं हा किस्सा स्वत: ‘लाभम’ च्या प्रमोशनच्या दरम्यान सांगितला की जेव्हा निर्मात्यांनी त्याच्यासोबत क्रितीला घेण्याचा विचार केला तेव्हा त्यानं स्पष्ट नकार दिला. तर त्याचवेळी ‘उप्पेना’ ची शूटिंग सुरु होती. त्याच चित्रपटात क्रिती ही विजयच्या मुलीच्या भूमिकेत होती आणि आता यात प्रेमिकेच्या भूमिकेत. हे थोडं विचित्र आहे असं विजयनं सांगितलं आणि अशात केमिस्ट्री तयार करणं अशक्य असल्याचं त्यानं सांगितलं.