बॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच त्याचा मुलगा देखील संन्यासी होण्याच्या मार्गावर

बॉलिवूड सुपरस्टारचा काही काळ आश्रमात 

Updated: Nov 5, 2019, 09:48 AM IST
बॉलिवूड अभिनेत्याप्रमाणेच त्याचा मुलगा देखील संन्यासी होण्याच्या मार्गावर

मुंबई : दिवंगत बॉलिवूड अभिनेता विनोद खन्ना यांच्या दोन मुलांबद्दल सगळ्यांनाच माहित आहे. अक्षय खन्ना, राहुल खन्ना या दोघांना सगळेच ओळखतात. पण विनोद खन्ना यांचा तिसरा मुलगा साक्षी खन्ना याच्याबद्दल फारच कमी जाणांना माहित आहे. 

जवळपास 2 वर्षांपूर्वी साक्षी खन्नाने स्वतःच प्रोडक्शन हाऊस सुरू केलं होतं. पण आता तो ही आपल्या वडिलांच्या म्हणजे विनोद खन्नाच्या पाऊलांवर पाऊल ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

"Death is nothing at all, I have only slipped into the next room I am I and you are you Whatever we were to each other, that we are still. Call me by my old familiar name, Speak to me in the easy way which you always used Put no difference in your tone, Wear no forced air of solemnity or sorrow Laugh as we always laughed at the little jokes we enjoyed together. Play, smile, think of me, pray for me. Let my name be ever the household world that it always was, Let it be spoken without effect, without the trace of shadow on it. Life means all that it ever meant. It it the same as it ever was, there is unbroken continuity. Why should I be out of mind because I am out of sight? I am waiting for you, for an interval, somewhere very near, Just around the corner. All is well." #HappyBirthdayDad

A post shared by Sakshi Khanna (@svkhanna) on

स्पॉटबॉयने दिलेल्या माहितीनुसार, साक्षी खन्ना देखील ओशोचा भक्त झाला आहे. काही दिवसांपूर्वी तो ओशोच्या आश्रमात गेला. त्यानंतर त्याने हा निर्णय घेतला आहे. विनोद खन्ना यांनी देखील आपल्या करिअरमध्ये यशाची उंची गाठल्यानंतर या सिनेजगतापासून दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. 

70 च्या दशकात विनोद खन्ना आचार्य रजनीश म्हणजे ओशोच्या मार्गदर्शनाने प्रभावित झाले होते. त्यांनी ओशोच्या आश्रमात जाऊन संन्यास घेतला होता. विनोद खन्नांनी 1990 मध्ये कविता खन्नासोबत दुसरं लग्न केलं. विनोद आणि कवीता यांची दोन मुले. मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा आहे. 

28 वर्षांच्या साक्षी खन्नाला काही वर्षांपूर्वी संजय लीला भन्साळीने लाँच केलं होतं. 'बाजीराव मस्तानी' सिनेमांत त्याने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम सांभाळलं होतं. त्यानंतर अशी चर्चा होती की, भन्साळी साक्षीला लाँच करणार आहेत. पण त्यानंतर बरेच दिवस कोणताच प्रोजेक्ट समोर आला नाही. 

तसेच साक्षीच्या अफेअर्सची देखील खूप चर्चा रंगली. साक्षी खन्नाचं नाव पूनम पांडेसोबत जोडण्यात आलं. दोघं अनेकदा एकमेकांसोबत फिरताना किंवा पार्टीत दिसले. मात्र या दोघांनी कधीच आपलं नातं मान्य केलं नाही. तसेच 2011 मध्ये साक्षी एका रेव पार्टीत पकडला गेला.