सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर केला पक्ष्यांनी हल्ला, फोटोशूटदरम्यान घडला भयंकर प्रकार

संगीता बिजलानी एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 80 च्या दशकात 'कातिल' चित्रपटातून मुख्य भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 

Updated: Nov 15, 2022, 11:59 PM IST
सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंडवर केला पक्ष्यांनी हल्ला, फोटोशूटदरम्यान घडला भयंकर प्रकार title=

मुंबई : सिनेमाची दूनिया जशी पडद्यावर मांडली जाते. तशी ती खऱ्या आयुष्यात नसते.  या ग्लॅमरस दुनियेत जेवढ्या सहज लव्हस्टोरीज पहायला मिळतात. तेवढ्याच सहज ईथे ब्रेकअपच्या बातम्या ऐकायला मिळतात. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये लग्न करताना साता जन्माचं वचन घेतलं जातं खरं. मात्र हे नात कधी तुटेल याची कुणालाच खात्री नसते. बॉलिवूडमध्ये लग्न मोडल्याच्या किंवा ब्रेकअपच्या बातम्या सतत ऐकायला मिळतात. 80-90 च्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्यासोबत काही वर्षांपूर्वी असाच काहिसा प्रकार घडला होता. ज्याची आजवर चर्चा आहे.

असं म्हटलं जात की, सलमान खानसोबत संगिता बिजलानीची जवळिकता एवढी वाढली होती की, हे दोघंही लग्न करणार होते. दोघांच्या लग्न पत्रिकादेखील छापल्या गेल्या होत्या. मात्र अचानक हे लग्न तुटलं. आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. जरी अभिनेत्रीचं नाव त्यावेळी सलमानमुळे चर्चेत असलं तरीही ती यावेळी एका व्हिडिओमुळे चर्चेत आली आहे.

अलीकडेच बॉलीवूड अभिनेत्री संगीता बिजलानीचा एक फोटोशूट व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये अभिनेत्री लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे पण फोटोशूट दरम्यान असंकाही घडतं की ती किंचाळते. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

संगीताच्या फोटोशूटचा व्हिडिओ समोर आला आहे
संगीता बिजलानी एकेकाळी बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री होती. तिने 80 च्या दशकात 'कातिल' चित्रपटातून मुख्य भूमिकेतून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. यानंतर तिने त्रिदेव, योद्धा असे अनेक चित्रपट इंडस्ट्रीला दिले. सुरुवातीपासूनच ती खूप दमदार अभिनेत्री आहे. संगीता बॉलिवूड अभिनेता सलमान खानची एक्स गर्लफ्रेंड देखील आहे. त्यामुळे तिचं नाव कायम चर्चेत असतं

अलीकडेच संगीता बिजलानीचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये ती तिचे फोटोशूट करताना दिसत आहे. दरम्यान असं काही घडतं की अभिनेत्रीचे संपूर्ण फोटोशूट खराब होतं. संगीताचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पक्षांनी केला अभिनेत्रीवर हल्ला 
व्हिडिओमध्ये, अभिनेत्री लाल रंगाच्या सॅटिन आउटफिटमध्ये पोज देताना दिसत आहे मात्र फोटोशूट दरम्यान अचानक काही पक्षी तिच्यावर हल्ला करतात ज्यामुळे ती खूप घाबरते.

फोटो शूट करताना किंचाळली
फोटोशूट दरम्यान, पक्षी अचानक संगीतावर हल्ला करतात, ज्यामुळे ती किंचाळते. यामुळे अभिनेत्रीला तिचे फोटोशूटही थांबवावं लागलं. इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत वुम्पलाच्या पेजने यासोबत कॅप्शनही दिलं आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'हल्ला! संगीता बिजलानीसोबत रिअल विरुद्ध रील'. ही रील पाहून अनेकांनी या पोस्टवर प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

संगीता बिजलानीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. जिथे एका यूजरने पोस्टवर कमेंट करत 'लुक्स डेंजरस' असं लिहिलं आहे. त्याचबरोबर, अजून एका युजर्सने अभिनेत्रीचं नाव देखील दिलं आहे. याशिवाय अनेकांनी कमेंट सेक्शनमध्ये स्माईल इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या आहेत.