लग्न कोणाचंही असो, नेटकऱ्यांची पसंती 'विरुष्का'लाच

दीपिका-रणवीर, प्रियांका-निक या सेलिब्रिटी जोड्यांना मागे टाकत विराट कोहली आणि अनुष्काने मारली बाजी 

Updated: Dec 6, 2018, 01:18 PM IST
लग्न कोणाचंही असो, नेटकऱ्यांची पसंती 'विरुष्का'लाच title=

मुंबई : भारतात सोशल मीडियावर लोकप्रिय असणाऱ्या चेहऱ्यांमध्ये अभिनेत्री अनुष्का शर्मा, दीपिका पदुकोण, प्रियांका चोप्रा यांच्या नावांचाही समावेश आहे. पण, मुळात या अभिनेत्री एकट्याच नव्हे तर त्याचे पतीसुद्धा चाहत्यांच्या फेव्हरेट लिस्टमध्ये आहेत. 

काही दिवसांपासून दीपिका पदुकोण-रणवीर सिंग, प्रियांका चोप्रा-निक जोनास यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो बरेच व्हायरल होत आहेत. पण, या फोटोंमध्ये बाजी मारली आहे ती म्हणजे अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि विराट कोहली या सेलिब्रिटी जोडीच्या एका फोटोने. 

विराट कोहलीने त्यांच्या पहिल्या करवा चौथला अनुष्कासोबतचा ट्विट केलेला फोटो या वर्षातील सर्वात जास्त लाईक मिळवणारा फोटो ठरला आहे. त्यामुळे लग्नसराईच्या या चर्चांमध्येही विरुष्काच सरस ठरले, असं म्हणणं वावगं ठरणार नाही. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ट्विटर अकाऊंट यावर्षांत सर्वात जास्त चर्चेतील अकाऊंट ठरले असून त्यापाठोपाठ राहुल गांधी आणि अमित शहा यांचं ट्विटर अकाउंट ठरलं आहे. तर, शाहरुख खान सातव्या स्थानावर आहे.  भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने फुटबॉल रसिकांना मैदानावर येऊन खेळाडूंचा उत्साह वाढवण्याचं ट्विटरवरुन केलेलं आवाहन यावर्षीचं सर्वात जास्त रिट्विट झालेलं म्हणजेत गोल्डन ट्विट ठरलं आहे.  

ट्विटर इंडियाच्या अकाऊंटवरुन 2018’s Biggest Moments in India on Twitter #ThisHappened, असं लिहित ही माहिती देण्यात आली. 

दाक्षिणात्य सिनेजगताची जादू 

ट्विटरवर ट्रेंडिग ठरलेल्या हॅशटॅग मध्ये दाक्षिणात्य सिनेमांनी बाजी मारली आहे.  टॉप टेन हॅशटॅगसह सर्वात प्रभावी हॅशटॅगमध्येही साऊथमधील 'सरकार' या सिनेमाने बाजी मारल्याचं कळत आहे.  

चित्रपटाची बाजी  प्रभावी हॅशटॅगमध्ये भारतातील #MeToo चळवळ दुस-या क्रमांकावर पाहायला मिळाली. या हॅशटॅगचा आधार घेऊन महिलांनी आपल्यावरील अत्याचाराला ट्विटरसारख्या सार्वजनिक व्यासपिठाचा आधार घेऊन वाचा फोडली होती. 

कर्नाटक निवडणुकीची चर्चा ट्विटरवही जास्त पाहायला मिळाली असून हॅशटॅग कर्नाटक इलेक्शन हे प्रभावी हॅशटॅगमध्ये तिस-या स्थानावर आहे.