कोण आहे तो डिझाईनर ज्यामुळे हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडदेखील व्यक्त करतंय दु:ख

डिझायरने कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर त्याचं निधन झालं आहे

Updated: Nov 29, 2021, 02:40 PM IST
 कोण आहे तो डिझाईनर ज्यामुळे हॉलिवूडच नव्हे तर बॉलिवूडदेखील व्यक्त करतंय दु:ख title=

मुंबई : फॅशन इंडस्ट्रीमधील सगळ्यात मोठं नावं म्हणजे Virgil Abloh, न्यूयॉर्कमध्ये, २९ नोव्हेंबरला प्रसिद्ध फॅशन डिझायनर व्हर्जिल अबलोह यांचं कर्करोगाशी दीर्घकाळ लढा दिल्यानंतर निधन झालं आहे. ते 41 वर्षांचे होते. लक्झरी समूह LVMH लुई वटोन मोएट हेनेसी आणि अबलोहच्या स्वतःच्या ऑफ-व्हाइट लेबलने रविवारी अबलोह यांच्या मृत्यूची घोषणा केली. ऑफ-व्हाइट लेबलची स्थापना अबलोह यांनी 2013 मध्ये केली होती.

LVMH चे अध्यक्ष बर्नार्ड अर्नाल्ट यांनी एका निवेदनात म्हटलं आहे की, "ही बातमी ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. व्हर्जिल हा एक उत्तम डिझायनर तर होताच, पण एक चांगला माणूस आणि हुशार माणूस होता." अबलोहच्या कुटुंबाने डिझायनरच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक स्टेटमेंट जारी करून त्याच्या मृत्यूची माहिती दिली. अबलोहला दोन वर्षांपूर्वी 'कार्डियाक अँजिओसार्कोमा' हा दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असल्याचं निदान झालं होतं. ज्यामध्ये हृदयात ट्यूमर होतो.

"2019 मध्ये कर्करोगाचे निदान झाल्यानंतर, त्यांनी या बद्दल कोणालाच न सांगता एकट्याने त्याच्याशी लढण्याचा निर्णय घेतला. अनेक आव्हानात्मक उपचार घेतले... आणि फॅशन जगतात त्यांचं काम सुरू ठेवलं," असं निवेदनात बर्नार्ड अर्नाल्ट म्हणाले आहेत. 2018 मध्ये, लुई व्हिटॉन येथे पुरुषांच्या ड्रेस डिझाईन करणारा फ्रेंच डिझाईन हाउसच्या इतिहासात अबलोह पहिला व्यक्ती होता. ते पहिलं घानायन अमेरिकन होते ज्यांच्या आईने त्यांना शिवणकाम शिकवलं. अबलोह यांच्याकडे फॅशनचं कोणतेही औपचारिक प्रशिक्षण नव्हतं, मात्र त्यांनी अभियांत्रिकीमध्ये बॅचलर आणि आर्किटेक्चरमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतलं होतं.

Virgil Abloh च्या निधनानंतर स्टार्सकडून श्रद्धांजली
Virgil Abloh, यांच्या निधनानंतर प्रियंका चोप्रा, सोनम कपूर, करण जौहर, सुपरमॉडल जीजी हदीद, बेला हदीद, केंडल जेनर, हेली बीबर, फुटबॉल लीजेंड David Beckham आणि बरेच फेमल डिझाईनर्स आणि  क्रिएटिव्ह डिझाईनर Virgil Abloh यांना श्रद्धांजली वाहत शोक व्यक्त केलाय.