अभिनेता विष्णु विशालने बॅडमेंटन खेळाडू ज्वाला गुट्टासोबत घेतले सात फेरे, पाहा फोटो

पाहा लग्नाचे खास फोटो 

Updated: Apr 22, 2021, 06:26 PM IST
अभिनेता विष्णु विशालने बॅडमेंटन खेळाडू ज्वाला गुट्टासोबत घेतले सात फेरे, पाहा फोटो

मुंबई : अभिनेता विष्णु विशालने गर्लफ्रेंड बॅडमेंटन खेळाडू ज्वाला गुट्टासोबत लग्न केलं आहे. 22 एप्रिल रोजी अगदी जवळच्या मित्रपरिवार आणि कुटुंब यांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. यावेळी ज्वालाने हिरव्या आणि लाल रंगाची साडी नेसली आहे. विष्णु विशालने सफेद रंगाचा धोतर आणि कुर्ता घातला आहे. 

ज्वाला आणि विष्णुचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या अगोदर या दोघांच्या हळदी आणि मेहंदीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्वाला आणि विष्णुने हैदराबादमध्ये खूप कमी लोकांच्या उपस्थितीत लग्न केलं आहे. 

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता कमी लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. लग्नाच्या विधी 21 एप्रिल रोजी सुरू झाली असून मेहेंदीच्या सोहळ्यानंतर ज्वाला आणि विष्णुने रिसेप्शन एन्जॉय केलं. या जोडीने ढोल आणि बॉलिवूड गाण्यावर डान्स केला आहे. 

ज्वाला आणि विष्णू हे दोघं बऱ्याच दिवसांपासून प्रेमात होते. गेल्यावर्षी म्हणजेच ज्वालाच्या 37 व्या वाढदिवशी या दोघांनी साखरपुडा केला होता. ज्वाला गुट्टा सध्या बॅडमिंटन अकॅडमी चालवते. तिने कॉमनवेल्थ खेळामध्ये, वर्ल्ड चॅम्पियनशिप, आशियाई चॅम्पियनशिप तसेच दक्षिण आशियाई चॅम्पियनशिप यामध्ये पदकं मिळविली आहेत. 

विष्णू विशालला तर दक्षिण सिनेसृष्टीत सुपरस्टार म्हणून ओळखलं जातं. तसेच तो एक क्रिकेटपटू म्हणूनही ओळखला जातो. क्रिकेट सोडल्यानंतर त्याने आपले नाव बदलून विष्णू असे नाव बदलले. आता तो प्रसिद्ध अभिनेता आहे.