सपनाच्या 'तेरी आंख्या का...' गाण्यावर परदेशी तरुणीचा डान्स व्हायरल

यूट्युबवर हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३,७२,७८७ वेळा पाहिला गेलाय

Updated: Dec 14, 2018, 12:12 PM IST
सपनाच्या 'तेरी आंख्या का...' गाण्यावर परदेशी तरुणीचा डान्स व्हायरल

मुंबई : हरियाणाची डान्सर सपना चौधरीच्या 'तेरी आंख्या का यो काजल' या गाण्यानं बॉलिवूडपासून भोजपुरी सिनेमापर्यंत अनेकांना थिरकायला भाग पाडलंय... हे गाणं कानावर पडताच सपनाचे ठुमके आठवतात... कारण, सपना चौधरीनं या गाण्यावर एकदा-दोनदा नाही तर कित्येकदा स्टेज परफॉर्मन्स दिलाय. 'बिग बॉस' या कार्यक्रमात झळकल्यानंतर सपनाच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झालीय. त्यामुळेच तिच्या डान्स स्टेप्स देशातच नाही तर परदेशातही फॉलो केल्या जात आहेत.

सध्या इंटरनेवर असाच एक व्हिडिओ व्हायरल होताना दिसतोय. या व्हिडिओत एक परदेशी तरुणी 'तेरी आंख्या का यो काजल' या गाण्यावर थिरकताना दिसतेय. दीप बरार नावाची ही तरुणी यूएएसची एक कोरिओग्राफर आहे. दीप बॉलिवूडच्या गाण्यांवर जबरदस्त परफॉर्मन्स देण्यासाठी प्रसिद्ध आहे. परफॉर्मन्ससाठी तिला भारतीय गाणीच जास्त भावतात.

दीपचा हा डान्स सपनाच्या डान्सनं प्रेरित असला तरी डान्स स्टेप्स मात्र तिनं कॉपी केलेल्या नाहीत... आणि तरीही तिचा हा डान्स अनेकांना आकर्षित करतोय... 

Deep Brar नावाच्या युट्यूब चॅनलवर यावर्षी २३ जून रोजी हा व्हिडिओ अपलोड करण्यात आलेला आहे. हा व्हिडिओ आत्तापर्यंत ३,७२,७८७ वेळा पाहिला गेलाय. तर हा व्हिडिओ लाईक करणाऱ्यांची संख्याही ७.५ हजारांहून अधिक आहे.