हडिप्पा! धमाकेदार सोहळ्यात नेहा कक्करच्या लग्नविधींना सुरुवात

नेहा आणि रोहनप्रीत यांच्या नात्याची चर्चा गेल्या बऱ्याच दिवसांपासून सुरु आहे   

Updated: Oct 21, 2020, 10:32 AM IST
हडिप्पा! धमाकेदार सोहळ्यात नेहा कक्करच्या लग्नविधींना सुरुवात
संग्रहित छायाचित्र

मुंबई : 'Nehu Da Vyah', 'नेहू दा व्याह' रिलीज होण्यापूर्वीच गायिका नेहा कक्कर Neha Kakkar हिच्या खऱ्याखुऱ्या आयुष्यातही एक रंजक वळण आलं आहे. नेहानं सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना या वळणाची एक झलकही दाखवली आहे. मंगळवारी तिनं सोशल मीडियावर तिच्या रोका समारंभातील एक व्हिडिओ पोस्ट केला. 

व्हिडिओ पोस्ट करत नेहानं यामध्ये होणारा पती रोहनप्रीत सिंग Rohanpreet Singh  याचे आणि त्याच्या कुटुंबीयांचे आभार मानत इतक्या सुरेख समारंभाचं आयोजन केल्याबद्दल आपल्या आईवडिलांचेही आभार मानले. तिनं पोस्ट केलेला हा व्हिडिओ पाहताना नकळतच आपणही त्या समारंभाचा एक भाग असल्याची अनुभूती चाहत्यांना होत आहे. 

इन्स्टाग्रामवर नेहा आणि रोहनप्रीत या दोघांनीही पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये ते रोका समारंभासाठी प्रवेश करताना दिसत असून, त्याचवेळी अस्सल पंजाबी अंदाजात, 'हडिप्पा.... पंजाब्बी... ' अशी आरोळी ठोकत एकच कल्ला होत असल्याचं पाहायला मिळत आहे. ढोल वाजू लागताच नेहा आणि रोहनप्रीतही इथं ठेका धरताना दिसत आहेत. 

 
 
 
 

A post shared by Neha Kakkar (@nehakakkar) on

मागील काही दिवसांपासून नेहानं रोहनप्रीतसोबतच्या नात्याबाबत काही पोस्ट करत या नात्याची जाहीर ग्वाही दिल्याचं पाहायला मिळत आहे. यातच तिनं एक व्हिडिओही पोस्ट केला होता. रोहनप्रीतनं त्याच्या कुटुंबीयांशी आपली भेट घडवून आणली त्याच क्षणांचा हा व्हिडिओ असल्याचं तिनं कॅप्शन देत सांगितलं होतं. या व्हिडिओमध्ये नेहाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्याजोगा आहे. सध्या चाहतेही या नव्या सेलिब्रिटी जोडीला त्यांच्या भावी जीवनासाठी शुभेच्छा देत आहेत.