close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून 'विरुष्का'वर नेटकरी पुन्हा फिदा

पाहा त्यांनी आता नेमकं काय केलं.... 

Updated: Sep 14, 2019, 11:38 AM IST
...म्हणून 'विरुष्का'वर नेटकरी पुन्हा फिदा
छाया सौजन्य- इन्स्टाग्राम

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी कायमच चाहत्यांची मनं जिंकली आहेत. सेलिब्रिटी जोड्यांच्या यादीत अनेकांच्या मनाचा ठाव घेणाऱ्या या दोघांचाही आणखी एक अंदाज पुन्हा एकदा चाहत्यांच्या मनावचा ठाव घेऊन गेला आहे. किंबहुना आपल्या पत्नीची म्हणजेच अनुष्काची अदा पाहून विराटही तिच्यावर पुन्हा एकदा भाळला असणार यात शंकाच नाही. 

विराटच्या सन्मानार्थ आयोजित एका कार्यक्रमात या दोघांची उपस्थिती पाहायला मिळाली होती. त्यावेळी सोनेरी रंगाचं जरीकाम असणाऱ्या एका सुंदर सलवारमध्ये अनुष्काचं सौंदर्य आणखी खुलून आलं होतं. तर, विराटही राखाडी रंगाच्या नेहरू जॅकेटमध्ये रुबाबदार दिसत होता. संपूर्ण कार्यक्रमात उपस्थितांसाठी ही जोडी आकर्षणाचा आणि चर्चेचा विषय राहिली होती. एकमेकांचा हात हातात घेऊन बसलेल्या विरुष्काचा अंदाज आणि त्यांचं एकमेकांवर असणारं प्रेम हे या कार्यक्रमातही लपून राहिलं नव्हतं. 

सोशल मीडियावर याच कार्यक्रमातील काही व्हिडिओसुद्धा व्हायरल  झाले. ज्यानंतर, खुद्द विराटनेही त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन काही फोटो पोस्ट करत आपलं मनोगत व्यक्त केलं. 'माझं नाव देण्यात आलेलं पविलियन मला कायमच आयुष्यातील आणि क्रिकेटमधील माझ्या प्रवासाचं स्मरण करुन देत राहील. त्याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे, आपल्या देशातील क्रिकेटमध्ये येऊ पाहणाऱ्या पुढील पिढीसाठीही ते एक प्रेरणास्त्रोत ठरेल', असं त्याने लिहिलं. 

दिल्लीत पार पडलेल्या या कार्यक्रमादरम्यान, फिरोजशहा कोटला स्टेडियमला अरुण जेटवी स्टेडियम हे नवं नाव देण्यात आलं. शिवाय विराट कोहलीचं नावही तेथील एका पविलियनला देण्यात आलं. या सोहळ्याच्याच वेळी विराट आणि अनुष्काची उपस्थिती सर्वांचं लक्ष वेधून गेली.