गर्लफ्रेंडसाठी काय-काय करावं लागतं हृतिक रोशनला; त्याची अशी अवस्था पाहून सबा आझाद होतेय ट्रोल

बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. हृतिक रोशन  नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. 

Updated: Nov 26, 2023, 12:54 PM IST
गर्लफ्रेंडसाठी काय-काय करावं लागतं हृतिक रोशनला; त्याची अशी अवस्था पाहून सबा आझाद होतेय ट्रोल title=

मुंबई : बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहतावर्ग आहे. हृतिक रोशन  नेहमीच त्याच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफमुळे चर्चेत असतो. जेव्हा पासून हृतिक आणि सबाच्या रिलेशनशिपवर शिक्कामोर्तब झाला तेव्हापासून सबाही कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. नुकतीच सबा आणि हृतिक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत पण यावेळी या दोघांच चर्चेत येण्यामागचं कारण थोडं वेगळं आहे.  यावेळी या दोघांचं चर्चेत येण्यामागचं कारण म्हणजे, त्यांची पर्सनल लाईफ आहे.

जेव्हा जेव्हा हे कपल एकत्र दिसत तेव्हा तेव्हा या कपलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर आगीसारखे पसरतात. चाहत्यांना हृतिक आणि सबाची जोडी खूप आवडते. मात्र नुकतंच हृतिक रोशनने असं काही तरी केलं आहे जे पाहून चाहते अभिनेत्याचं कौतुक करताना थकत नाहीत. तर अनेकांनी मात्र या जोडीला जबरदस्त ट्रोल केलं आहे. नुकतेच सोशल मीडियावर सबाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यावेळी सबाने सुंदर जांभळ्या रंगाची साडी नेसली आहे. 

समोर आलेले हे फोटो हृतिक रोशनने क्लिक केले असल्याचं स्वत: सबाने सांगितलं आहे. हा लूक पुर्ण करण्यासाठी सबाने जांभळ्या साडीसोबत लाल रंगाचा ब्लाऊज परिधान केला आहे. याचबरोबर हलका मेकअप आणि मोकळे केस सोडत सबाने तिचा हा लूक पुर्ण केला आहे. अवघ्या काही वेळातच सबाचे हे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. चाहते हृतिक आणि सबाच्या लग्नाची वाट पाहत आहेत. अनेकदा हृतिक आणि सबाला याबद्दल विचारलंही जातं. हृतिक रोशन गेल्या एक वर्षापासून सबाला डेट करत आहे.  याचबरोबर हृतिक आणि सबा या दोघांनीही त्यांचं नातं कन्फर्म केलं आहे.

अनेकांनी तिच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या लूकचं भरभरुन कौतुक केलं आहे. एकाने कमेंट करत लिहीलं आहे की, स्टनिंग लूक, तर अजून एकाने लिहीलं, खूप सुंदर दिसत आहेस सबा डार्लिंग. तर अजून एकाने लिहीलं, हृतिक भाईची पसंत. तर अजून एकान लिहीलं की, Beautiful soul saba तर अनेकांनी मात्र सबाला ट्रोल केलंय, एकाने लिहीलंय, हृतिक आता तु हिच्यासाठी हेच काम करायचं बाकी राहिला होतास. तर अजून एक म्हणाला, एकदम बकवास अशा प्रकारच्या अनेक कमेंट करत युजर्स सबाला चांगलंच ट्रोल करत आहेत. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

लवकरच हृतिक फायटर या चित्रपटात दिसणार आहे. एरियल अॅक्शनवर आधारित या चित्रपटात हृतिक रोशन आणि दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.  फायटर चित्रपट जानेवारी 2024 मध्ये प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.