close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

अतिउत्साही स्पर्धकाकडून नेहा कक्करला KISS

पाहा हा व्हिडिओ 

Updated: Oct 17, 2019, 11:48 AM IST
अतिउत्साही स्पर्धकाकडून नेहा कक्करला KISS

मुंबई : लोकप्रिय रिऍलिटी शो इंडियन आयडलला प्रेक्षकांकडून खूप पसंती आहे. देशभरातील लोक आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी या शोच्या मंचावर आपली गायिकी सादर करत आहेत. पण येत्या आठवड्यात या शोमध्ये असं काही होणार आहे जे सगळ्यांनाच आश्चर्यचकीत करणार आहे. 

या कार्यक्रमाचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये एक अतिउत्साही स्पर्धकाने परिक्षक नेहा कक्करला किस केलं आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 

हा व्हिडिओ सोनी टीव्हीने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. एक स्पर्धक खूप गिफ्ट्स घेऊन स्टेजवर येतो. तो एक-एक करून गिफ्ट्स नेहाला देतो. त्यानंतर नेहा त्याला हग करते मात्र तेव्हाच तो स्पर्धक नेहाच्या गालावर किस करतो. यानंतर नेहा आपला चेहरा लपवते आणि दूर निघून जाते. या घटनेनंतर इतर परिक्षक देखील हैराण होतात. 

पुढे नेमकं काय होतं हे पाहण्यासाठी पूर्ण एपिसोड पाहणं गरजेचं असतं. अतिउत्साही स्पर्धकाने नेहाला जबरदस्ती किस केलं. हा व्हिडिओ खूप कमीवेळात व्हायरल झाला आहे. या घटनेनंतर परिक्षक विशाल आणि अनू मलिक यांची काय प्रतिक्रिया आहे याची देखील चाहत्यांना उत्सुकता आहे. अजून नेहाची प्रतिक्रिया देखील समोर आलेली नाही.