Aamir Khan Audition For Laapataa Ladies: आमिर खान आणि किरण राव यांचा लापता लेडीज हा चित्रपट चांगलाच गाजतोय. भारताकडून अधिकृतरित्या या चित्रपटाला ऑस्कर 2025साठी पाठवण्यात आलं आहे. त्यानंतर हा चित्रपट पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. आमिर खानची पूर्वाश्रमीची पत्नी किरण ही या चित्रपटाची दिग्दर्शिका आहे. तर, कोणतीही मोठी स्टारकास्ट नसतानाही या चित्रपटाने प्रेक्षकांची गर्दी खेचून आणण्यास यशस्वी ठरला आहे. पण तुम्हाला माहितीये का या चित्रपटासाठी स्वतः आमिर खाननेदेखील ऑडिशन दिले होते. मात्र त्याची निवड झाली नव्हती.
लापता लेडीज चित्रपटातील सर्वच कलाकारांनी उत्तम अभिनय केला आहे. कमी बजेटमध्येही चित्रपटाने छप्परफाड कमाई केली होती. ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर सिनेमाची क्रेझ आणखी वाढली. आता तर चित्रपटाने ऑस्करमध्ये एन्ट्री मारली आहे. आमिर खाननेदेखील या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. या चित्रपटात त्याला एक छोटीशी तरी भूमिका साकारायची होती. मात्र त्याला नकार देण्यात आला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमिर खानने चित्रपटातील एका भूमिकेसाठी ऑडिशनदेखील दिली होती. मात्र, त्याला हे सांगून रिजेक्ट करण्यात आलं की तो खूप मोठा स्टार आहे. त्यानंतर ही भूमिका रवी किशनला देण्यात आली. खुद्द आमिर खान यानेच हा खुलासा केला आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देताना त्याने म्हटलं होतं की, 'या चित्रपटाची कथा खूपच सुंदर होती आणि त्यात एक छान व्यक्तिरेखादेखील होती. मी विचार केला की ही कथा किरणला द्यावी कदाचित तिला ती जास्त आवडेल.'
आमिर खान या चित्रपटात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका निभावण्यास उत्सुक होते. आमिर खान यांनी म्हटलं की, मला चित्रपटात एक भूमिका करायची होती मात्र किरणने म्हटलं की, तु खूप मोठा स्टार आहेस आणि माझा चित्रपट छोटासा आहे. तु तो खराब करुन टाकशील. तेव्हा मी म्हटलं की, मला कमीत कमी स्क्रीन टेस्ट तर करुद्यात. तेव्हा मी स्क्रीन टेस्ट दिली. स्क्रिन टेस्टनंतर मला आणि किरणला ही भूमिका आवडली. लोकांना माझ्याकडून खूप अपेक्षा आहेत. त्यामुळं आम्हाला असं वाटलं की मी चित्रपटात नसायला हवं.' असं आमिर खान यानी म्हटलं आहे.
पुन्हा एकदा आमिर खानने किरण राव यांना म्हटलं की, 'मी ट्रॉपिक थंडरप्रमाणे रॉबर्ट डाउनी ज्यूनिअरसारखा त्याचा लूक बदलण्यासाठी तयार आहे. मात्र, दिग्दर्शकांनी मला पुन्हा आडवलं. तुझा लूक बदलला तर काय फायदा, असं किरणने मला सांगितलं. त्यामुळं मी ही विचार सोडून दिला.'