Aishwarya Rai - Abhishek Bachchan : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनला सगळेच ओळखतात. ऐश्वर्यानं तिच्या अभिनयासोबत तिच्या सुंदरतेसाठी ओळखली जाते. ऐश्वर्या तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असते. ऐश्वर्यानं 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनशी लग्न केलं. आज ते दोघं आनंदी वैवाहिक आयुष्य जगत आहेत. पण तुम्हाला माहितीये का 1994 मध्ये जेव्हा ऐश्वर्यानं विश्वसुंदरीचा खिताब जिंकला तेव्हा अभिषेक कसा दिसायचा?
ऐश्वर्या 20 वर्षांची होती तेव्हा तिनं मिस वर्ल्डचा खिताब जिंकला होता. मिस वर्ल्डचा खिताब जिंकत ऐश्वर्यानं संपूर्ण जगात भारताचं नावं झळकवलं होतं. त्यावेळी अभिषेकची काही खास ओळख नव्हती. त्याला सगळे बॉलिवूडचे दिग्गज अभिनेता अमिताभ बच्चन यांचा मुलगा म्हणून ओळखायचे. तर जेव्हा ऐश्वर्या मिस वर्ल्ड झाली होती, त्यावेळी अभिषेक कसा दिसत होता त्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा फोटो शेअर करत नेटकऱ्यानं कॅप्शन दिलं आहे की अभिषेक बच्चनचा मॅगझिनमध्ये प्रकाशित झालेला हा पहिला फोटो. 1994 शी मध्ये हा फोटो प्रकाशित झाला होता. फिल्म फेअरच्या आरकाईव्हमध्ये हा फोटो सापडला आहे. दरम्यान, या फोटोत अभिषेक हा त्याची आई जया बच्चन यांच्यासोबत दिसला आहे.
Abhishek Bachchan picture from Filmfare archive. its his 1st image appeared in the magazine in 1994. pic.twitter.com/pd1Ig7L6sh
— Raghuvendra Singh (@raghuvendras) March 5, 2013
रिपोर्ट्सनुसार, ऐश्वर्या आणि अभिषेक हे दोघं जेव्हा गुरु या चित्रपटाचं शूटिंग करत होते तेव्हा अभिषेक आणि ऐश्वर्यामध्ये जवळीक निर्माण झाली होती. त्यानंतर अभिषेकनं ऐश्वर्याकडे लग्नाची मागणी घातली. त्यानंतर दोघांनी 2007 मध्ये लग्न केलं. त्यांनी दोन पद्धतीनं लग्न केलं होतं. एक म्हणजे नॉर्थ इंडियन आणि दुसरं बंगाली पद्धतीनं. त्याचं लग्न हे अमिताभ बच्चन यांच्या प्रतीक्षा बंगल्यात झालं होतं. तर 2011 मध्ये त्यांच्या घराच एका लहाण पाहुणीचे आगमन झाले. ती पाहुणी दुसरी कोणी नसून आराध्या आहे.
हेही वाचा : सलमान, विवेकला डिच करुन ऐश्वर्याने का केलं अभिषेकशी लग्न?
ऐश्वर्याच्या कामाविषयी बोलायचे झाले तर 17 वर्षांची असताना ऐश्वर्यानं फोर्ड स्पर्धा जिंकली होती. तर 1994 मध्ये मिस वर्ल्ड झाली आणि 1997 मध्ये तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. ऐश्वर्याच्या या चित्रपटाचं नाव 'और प्यार हो गया' असे आहे. त्या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता बॉबी देओल महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता. ऐश्वर्या ही एकमेव अशी भारतीय आहे जिनं पेप्सी आणि कोकाकोला या दोन्ही प्रतिस्पर्धी ब्रॅंडची जाहिरात केली आहे. तर तिला पेप्सीच्या जाहिरातीतून लोकप्रियता मिळाली होती. मिस वर्ल्डच्या वोटिंगच्या आधारे ऐश्वर्या दोन वेळा म्हणजेच 2000 आणि 2010 वर्षात जगातिल सगळ्यात सुंदर स्त्री ठरली होती.