मुंबई : मल्टी स्टारर 'मिशन मंगल' चित्रपट १५ ऑगस्टच्या मुहूर्तावर रूपेरी पडद्यावर दाखल झाला आहे. चित्रपट प्रदर्शित होताच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहेत. चित्रपटाची संपूर्ण टीम सध्या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. सध्या सोशल मीडियावर अभिनेता अक्षय कुमार आणि अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये अक्षय सोनाक्षीचा मेकअप करताना दिसत आहे.
चित्रपटात अक्षय कुमारसह विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, कीर्ति कुल्हरि, नित्या मेनन भूमिका साकरताना दिसत आहेत. याआधीदेखील 'मिशन मंगल'चा एक ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला होता. ट्रेलराला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली होती.
'मिशन मंगल' चित्रपटाचं दिग्दर्शन जगन शक्ति यांनी केलं आहे. चित्रपटात अक्षय कुमार संशोधक राकेश धवन या मिशनच्या प्रमुखाची भूमिका साकारत दिसत आहे.