ईशा देओलने रागाच्या भरात अमृता रावच्या मारली कानशिलात, वाचा किस्सा

ईशाला याबाबत अजिबात पश्चाताप नाही 

Updated: Oct 26, 2021, 12:21 PM IST
ईशा देओलने रागाच्या भरात अमृता रावच्या मारली कानशिलात, वाचा किस्सा

मुंबई : बॉलीवूड इंडस्ट्रीत अभिनेत्रीमधील वाद हे काही नवीन नाहीत. करीना कपूर खान आणि बिपाशा बसूचे शाब्दिक भांडण असो किंवा सोनम कपूरने ऐश्वर्या राय बच्चनला 'आंटी' म्हणणे असो, या इंडस्ट्रीमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांनी मीडियामध्ये त्यांच्या भांडणामुळे प्रसिद्धी मिळवली आहे. 

याच कारणामुळे इंडस्ट्रीतील काही अभिनेत्री एकमेकांसोबत काम करणे टाळतात, तर काही वक्तव्यांमधून एकमेकांना टोमणे मारतात. पण तुम्ही कधी ऐकले आहे की, दोन अभिनेत्रींमधील भांडण इतके वाढले आहे की, प्रकरण मारामारीपर्यंत पोहोचले आहे.

ईशा देओल आणि अमृता राव यांची कॅट फाईट कुणापासून लपलेली नाही. दोघांनाही एकमेकांशी बोलणे आवडत नव्हते. पण ईशा आणि अमृतामधील भांडण एकदा मारामारीपर्यंत पोहोचले होते. सुमारे 15 वर्षांपूर्वी ईशाने चित्रपटाच्या सेटवर सर्वांसमोर अमृताला कानाखाली मारली होती. या घटनेने संपूर्ण बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली आहे.

इशा देओल आणि अमृता राव 2006 मध्ये रिलीज झालेल्या 'प्यारे मोहन' चित्रपटात एकत्र दिसल्या होत्या. या चित्रपटात फरदीन खान आणि विवेक ओबेरॉय हे देखील होते. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ईशाने अमृताला कानाखाली मारली होती. याचा खुलासा खुद्द ईशा देओलने तिच्या एका मुलाखतीत केला आहे. इतकंच नाही तर ईशाने असंही म्हटलं होतं की, तिला याबद्दल कोणताही पश्चाताप नाही.

ईशा देओलने 'टाइम्स ऑफ इंडिया'ला मुलाखत दिली, ज्यामध्ये तिने अमृता रावसोबतच्या वादावर मोकळेपणाने बोलले. ईशा म्हणाली, 'पॅकअपनंतर एक दिवस अमृताने माझे दिग्दर्शक इंद्र कुमार आणि कॅमेरामन यांच्यासमोर शिवीगाळ केली. तेव्हा ती मला पूर्णपणे चुकीची वाटली. त्यावेळी रागाच्या भरात मी अमृताला कानाखाली मारली. मी माझा स्वाभिमान जपत होते आणि मला त्याबद्दल कोणताही पश्चात्ताप नाही.

पुढे, ईशा म्हणाली, ' अमृता राव याच गोष्टीसाठी पात्र आहे. त्यावेळी मी फक्त माझा सन्मान आणि स्वाभिमान जपत होते. या मुलाखतीत ईशाने असेही सांगितले की जेव्हा अमृताला तिने काय केले हे समजले. मग ती आली आणि माझी माफी मागितली. आता आमच्यात गोष्टी ठीक आहेत.