'एका रात्रीत आयुष्य बदललं' अंकिता लोखंडेने सांगितलं सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपचं कारण

अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस 17 मुळे चर्चेत आहे. अंकिताने तिचा पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे आणि तिच्या पतीसोबतच्या भांडणामुळे ती सतत चर्चेत असते.

Updated: Oct 31, 2023, 01:05 PM IST
'एका रात्रीत आयुष्य बदललं' अंकिता लोखंडेने सांगितलं सुशांत सिंह राजपूतसोबत ब्रेकअपचं कारण title=

मुंबई : अंकिता लोखंडे सध्या बिग बॉस 17 मुळे चर्चेत आहे. अंकिताने तिचा पती विकी जैनसोबत बिग बॉसच्या घरात प्रवेश केला आहे आणि तिच्या पतीसोबतच्या भांडणामुळे ती सतत चर्चेत असते. अभिनेत्रीच्या चाहत्यांना विकी जैनचं अंकितासोबतचे वागणं पसंत नाही त्यामुळे विकीला ट्रोलिंगचा सामनाही करवा लागला आहे. दरम्यान, या शोमध्ये अभिनेत्री पहिल्यांदाच दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतबद्दल बोलताना दिसली आहे.

वीकेंड का वॉर एपिसोडमध्ये सलमान खानने विकी जैनला तिच्या अंकितासोबतच्या वागणुकीबद्दल कठोर क्लास देताना दिसला. दरम्यान, शोमध्ये अंकिताने पहिल्यांदाच बिग बॉस 17 मधील दिवंगत बॉलिवूड अभिनेता आणि एक्स बॉयफ्रेंड सुशांत सिंग राजपूतबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. यावेळी अभिनेत्री सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलताना दिसली. सुशांत आणि अंकिताच्या नात्याची सुरुवात 'पवित्र रिश्ता'च्या सेटवर झाली. या दोघांनी 2010 मध्ये डेट करायला सुरुवात केली आणि 2016 मध्ये यांचं ब्रेकअप झालं.

आता बिग बॉस 17 च्या लेटेस्ट एपिसोडमध्ये, अंकिता लोखंडे सह-स्पर्धक मुनव्वर फारुकीशी तिच्या नात्याबद्दल आणि सुशांत सिंग राजपूतसोबतच्या ब्रेकअपबद्दल बोलताना दिसली. तिने मुनव्वरला सांगितलं की,  सात वर्ष ती आणि सुशांत सिंग राजपूत रिलेशनशिपमध्ये होते. पणनंतर सुशांतने तिच्यासोबतचं अचानक ब्रेकअप केलं.

मुनव्वरशी बोलताना अंकिता म्हणाली, 'तो एका रात्री अचानक गायब झाला. त्याला सक्सेस मिळत होतं तेव्हा लोकं त्याचे कान भरत होते. त्याने कधीच त्याच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं नाही, त्याने अचानक सगळंकाही संपवलं.

याआधी अंकिताने सांगितलं होतं की, सुशांत सिंग राजपूतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर तिला या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी सुमारे अडीच वर्षे लागली. मात्र ब्रेकअपनंतर सुशांत सिंग राजपूत पुढे गेला होता, मात्र त्यानंतरही ती इतर कोणाला डेट करण्याचा विचारही करू शकत नव्हती.

अंकिता लोखंडे आणि सुशांत सिंग राजपूत यांनी पवित्र रिश्तामध्ये अर्चना आणि मानव यांच्या मुख्य भूमिका साकारल्या होत्या, ज्यामध्ये प्रेक्षकांना त्यांची जोडी आणि केमिस्ट्री खूप आवडली होती. पण, सुशांत सिंग राजपूतने बॉलिवूड करिअरवर लक्ष केंद्रित करण्यासाठी २०११ मध्ये 'पवित्र रिश्ता' सोडलं. 2010 मध्ये अभिनेत्याच्या आकस्मिक मृत्यूने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं. मृत्यूपूर्वी सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्तीला डेट करत होता.

तर अंकिताने आता विकी जैनसोबत लग्न केलं आहे. काही वर्षे  डेट केल्यानंतर अभिनेत्रीने 2021 मध्ये त्याच्याशी लग्न केलं. गेल्या काही मुलाखतींमध्ये अंकिता सुशांत सिंग राजपूतबद्दलही मोकळेपणाने बोलताना दिसली आहे.