लंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर

KBC 16: लंडनमध्ये एका दुकानदाराने अमिताभ बच्चन यांचा गरीब म्हणून अपमान केला होता. त्याला बिग बींनी दिलं होतं सडेतोड प्रत्युत्तर.

Soneshvar Patil सोनेश्वर पाटील | Updated: Sep 14, 2024, 03:17 PM IST
लंडनमधील दुकानदाराने गरीब म्हणून बिग बींचा केला अपमान, अमिताभ बच्चन यांनी दिलं सडेतोड प्रत्युत्तर title=
Amitabh Bachchan

Amitabh Bachchan : बॉलिवूड अभिनेते अमिताभ बच्चन हे नेहमी कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. चाहत्यांमध्ये देखील त्यांच्या अभिनयाची जोरदार चर्चा होत असते. सध्या बिग बी यांचा 'कौन बनेगा करोडपती'चा 16 वा सीझन सुरु आहे. या शोच्या वेळी अमिताभ बच्चन त्यांच्या आयुष्यातील अनेक अनुभव शेअर करत असतात. नुकताच त्यांनी एक लंडनमध्ये आलेला अनुभव शेअर केला आहे. 

'कौन बनेगा करोडपती'च्या शोमध्ये हॉट सीटवर बसलेल्या स्पर्धकाने अभिनेते अमिताभ बच्चन यांना एक प्रश्न विचारला होता. ज्यामध्ये त्याने म्हटलं होतं की, तुम्ही एखादी वस्तू खरेदी करत असताना किंवा करण्यापूर्वी त्या वस्तूची किंमत पाहता का? या प्रश्नावर अमिताभ बच्चन म्हणाले की, हो ते स्वाभाविक आहे.  त्यांनी त्याच्या प्रश्नावर लंडनमध्ये घडलेला किस्सा सांगितला. 

काय म्हणाले अमिताभ बच्चन? 

अमिताभ बच्चन लंडनमध्ये गेले होते. त्यावेळी तिथे शॉपिंग करत असताना त्यांची नजर एका टायवर पडली. त्यांना ती टाय खूप आवडली होती. ते त्या टायकडे बघतच राहिले. तेवढ्यात बिग बी यांना पाहून दुकानदार म्हणाला की, या टायची किंमत 120 पौंड आहे. दुकानदाराला वाटले की अमिताभ बच्चन ही टाय खरेदी करू शकणार नाहीत. हा दुकानदाराचा गैरसमज होता की, अमिताभ बच्चन यांना ती टाय परवडणार नाही. त्यांनी त्या दुकानदाराला जशास तसे उत्तर देत दुकानदाराला अशाच दहा टाय पॅक करायला सांगितल्या. त्यानंतर बिग बी म्हणाले की, कधी कधी आपण हे सुद्धा समजून घेतलं पाहिजे की आपल्याला कोणी कमी समजू नये. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

'वेट्टैयन' चित्रपटात दिसणार अमिताभ बच्चन

अमिताभ बच्चन हे शेवटचे 'कल्की 2898 एडी' या चित्रपटात दिसले होते. या चित्रपटात कमल हसन, दीपिका पदुकोण आणि प्रभास यांच्या प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाने जगभरात 1000 कोटींहून अधिक कमाई केली होती. आता अमिताभ बच्चन हे 'वेट्टैयन' या चित्रपटात दिसणार आहेत. या चित्रपटात मेगास्टार रजनीकांत  मुख्य भूमिकेत दिसणार आहे.