प्रेग्नेंट नीना गुप्ता यांना कोण म्हणालं, तुझ्या मुलीला माझं नाव देतो, लग्न कर ..

नीना गुप्ता यांचा खासगी जीवनाबाबत मोठा खुलासा 

Updated: Jun 16, 2021, 05:47 PM IST
प्रेग्नेंट नीना गुप्ता यांना कोण म्हणालं, तुझ्या मुलीला माझं नाव देतो, लग्न कर ..

मुंबई : अभिनेत्री नीना गुप्ता पुन्हा एकदा आपल्या लग्नामुळे चर्चेत आल्या आहेत. नीना गुप्ता यांच्या खासगी जीवनातील अतिशय नाजुक गोष्टी त्यांच्या ऑटोबायोग्राफीतून समोर आल्या आहेत. नीना गुप्ता या क्रिकेटर विवियन रिचर्डसोबत असलेल्या नात्यामुळे चर्चेत होत्याच. पण आता त्यांनी अभिनेते सतीश कौशिक यांच्याबद्दल मोठा खुलासा केला आहे.  

निना गुप्ता यांची ऑटोबायोग्राफी प्रदर्शित करण्यात आली आहे. अभिनेत्री करीना कपूरच्या हस्ते त्यांची ऑटोबायोग्राफी लाँच करण्यात आली. यावेळी निना यांनी त्यांच्या जीवनातील अनेक चांगले-वाईट अनुभव सांगितले आहेत. ऑटोबायोग्राफीमध्ये त्यांनी अभिनेते सतीश कौशिक (Satish Kaushik) यांच्याबद्दल देखील एक मोठा खुलासा केला आहे. 

निना गुप्ता यांनी सांगितलं की,  जेव्हा माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड्स यांच्या मुलीला त्या जन्म देणार होत्या तेव्हा त्यांना सतीश कौशिक यांनी लग्नासाठी मागणी घातली होती. निना गुप्ता गरोदर असून देखील सतीश यांनी निना गुप्ता यांना लग्नासाठी विचारलं होतं. पण निना यांनी सतीश यांना लग्नासाठी नकार दिला. 

त्या म्हणाल्या, 'सतीश म्हणाले होते की, जर बाळाचा वर्ण माझ्यासारखा असेल तर आपण सगळ्यांना सांगू शकतो, की हे माझं बाळ आहे.' पण निना यांनी एकट्यांनी मोठ्या जिद्दीने आणि संघर्षांचा सामना करत त्यांच्या मुलीला वाढवलं. निना गुप्ता यांच्या मुलीचं नाव मसाबा असं आहे. निना गुप्ता यांनी ऑटोबायोग्राफीच्या माध्यमातून अनेक गोष्टींचा खुलासा केला. 

इंडस्ट्रीमधील राजनीती, कास्टिंग काऊच इत्यादी गोष्टींबद्दल निना यांनी सांगितंल आहे. निना यांचं माजी क्रिकेटर विवियन रिचर्ड यांच्यासोबत अफेयर होतं. रिचर्ड विवाहीत होते. कालांतराने दोघे विभक्त झाले. अनेक अडचणींचा सामना करत असताना निना यांनी रिचर्डच्या मुलीला जन्म दिला. त्यांच्या मुलीचं नाव मसाबा आसे असून त्यांनी सीए विवेक मेहरा यांच्यासोबत लग्न केलं आहे.