शाहीद आणि करिना एकमेकांसमोर येतात तेव्हा...

 कपिलच्या शोमध्ये त्यांची भेट झाली.  

Updated: Dec 18, 2019, 06:29 PM IST
शाहीद आणि करिना एकमेकांसमोर येतात तेव्हा...

मुंबई : अभिनेता शाहीद कपूर आणि अभिनेत्री करिना कपूर हे दोघांनी त्यांच्या आयुष्यात एक पाऊल पुढे टाकलं असलं तरी त्यांच्या नात्याच्या चर्चा आजही चाहत्यांमध्ये रंगत असतात. बॉलिवूडच्या पार्टांमध्ये किंवा कार्यक्रमांमध्ये ते कधी एकमेकांसमोर येत नाहीत. पण आता विनोदाचा बादशाह कपिलच्या शोमध्ये त्यांची भेट झाली. करिनाचा 'गुडन्यूज' चित्रपट लवकरच चाहत्यांच्या भेटीला येणार आहे. सध्या ती चित्रपटाच्या प्रमेशनमध्ये व्यस्त आहे. २७ डिसेंबर रोजी 'गुडन्यूज' चित्रपट मोठ्या पडद्यावर दाखल होणार आहे.  

कपिलच्या शोचा एक व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये जो शाहीद करिना समोर येत आहे, तो शाहीद नसून अभिनेता चंदन प्रभाकर आहे. शोमध्ये त्याने 'कबीर सिंग'ची भूमिका साकारली आहे. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

akshaykumar sir and the whole team of the #goodnewwz on the set ofhekapilsharmashow. This episode is coming sookshaykumar kiaraaliaadvanidiljitdosanjh #kareenakapoorkhan #akshaykumarsir

 

शाहीदला अशा रूपात पाहूण करिना पोट धरून हसताना दिसत आहे. 'कबीर सिंग' चित्रपटात शाहीद कपूर आणि किआरा आडवाणीने मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटानंतर त्यांच्या करियरला चांगलीच कलाटणी मिळाली आहे. 

प्रेमात उद्ध्वस्त झालेल्या कबीरची कहानी चाहत्यांना चांगलीच भावली होती. चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर देखील दमदार कमाई केली होती. 'कबीर सिंग' चित्रपटानंतर किआराचा 'गुडन्यूज' चाहत्यांच्या किती पसंतीस पडतो हे पाहणं तितकचं महत्त्वाचं ठरणार आहे. 

तर दुसरीकडे आपल्या विनोदबुद्धीने चाहत्यांना खळखळून हसवणाऱ्या कपिलच्या 'द कपिल शर्मा शो'चे येत्या शनिवारी १०० भाग पूर्ण होणार आहेत. त्यामुळे शोच्या सेटवर आनंदाचे वातावरण आहे.