जेव्हा दाऊद इब्राहिमला ऋषि कपूरला भेटले, ४ तासाच्या भेटीत नेमकं काय घडलं?

ऋषि कपूर यांचा एक असा चाहता आहे. ज्याला संपूर्ण जग अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखतं.

Updated: May 1, 2021, 08:21 AM IST
जेव्हा दाऊद इब्राहिमला ऋषि कपूरला भेटले, ४ तासाच्या भेटीत नेमकं काय घडलं?

मुंबई : ऋषि कपूर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक असे अभिनेता होते.  ज्यांच्या सौंदर्य आणि अभिनयाने लाखो लोक त्यांच्या प्रेमात होते. आपल्या काळात ऋषि कपूर यांनी अनेकांना वेड लावलं होतं, मात्र '102 नॉट आउट' चित्रपटाचं सर्वांनी त्यांच्या जबरदस्त अभिनयाचं कौतुक केलं. ऋषि कपूरची फॅन लिस्ट खूप मोठी आगे. तरुण ते वृद्धांपर्यंत ऋषि कपूर यांचा चाहतावर्ग मोठा आहे. मात्र ऋषि कपूर यांचा एक असा चाहता आहे ज्याला संपूर्ण जग अंडरवर्ल्ड डॉन म्हणून ओळखतं. आम्ही बोलत आहोत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम बद्दल ज्याने भारतात त्याची दहशत निर्माण केली.

दाऊद इब्राहिमला ऋषि कपूर फार आवडायचे. इतकंच नाही तर दाऊद इब्राहिम ऋषि कपूर यांना भेटले तेव्हा अंडरवर्ल्ड डॉनने त्यांच्यासाठी शूज खरेदी करण्याची इच्छा व्यक्त केली होती. याचा खुलासा ऋषि यांनी स्वतः 'खुल्लम खुल्ला' या आत्मचरित्रातून केला आहे. ऋषि यांनी आपल्या पुस्तकात त्या दिवसांचा उल्लेख केला, जेव्हा त्यांना दोनदा दाऊद इब्राहिमचा सामना करावा लागला.

बॉलिवूडचे सुंदर अभिनेता ऋषि कपूर यांनी आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून दाऊद इब्राहिमशी झालेल्या पहिल्या भेटीविषयी लिहिलं आहे. की, हा काळ 1988 चा होता जेव्हा भारतात मोबाइल फोन नव्हता. आशा भोसले आणि आरडी बर्मन नाईटचं दुबईमध्ये आयोजित करण्यात आलं होतं, ज्यात शैलेंद्र सिंह परफॉर्म करणार होते. मी माझा मित्र बिट्टू आनंदसोबत दुबईला पोहोचलो.

दाऊद इब्राहिमसोबत एअरपोर्टवर नेहमीच एक माणूस असायचा, जो दाऊदला व्हीआयपी मूव्हमेंन्टची खबर त्याला द्यायचा. जेव्हा मी एअरपोर्टबाहेर पडलो तेव्हा एक माणूस माझ्याकडे आला आणि त्याने मला कॉल दिला. आणि तो माणूस म्हणाला- 'दाऊद साहेब बोलतील' त्यावेळी तो राज्याचा शत्रू नव्हता.

दुबईत माझं स्वागत करत दाऊद म्हणाला- तुम्हाला इथे काही लागलं तर मला सांगा. एवढंच नाही तर त्याने मला त्याच्या घरी बोलावलं. मी त्यांचे म्हणणं ऐकलं आणि म्हणालो की मी याचा विचार करेन. मी त्यावेळी दुबईच्या हयात रीजेंसीमध्ये थांबलो होतो. तिथे माझी ओळख एका माणसाशी झाली, त्याचं नाव बाबा होतं. बाबा दाऊतचा राईट हॅंन्ड माणूस होता.

त्यानंतर बाबा म्हणाला आपल्याबरोबर चहा पिण्याची दाऊद साहेबांची इच्छा आहे. मला यात काही चूक दिसली नाही आणि मी आमंत्रण स्वीकारलं. त्याच दिवशी संध्याकाळी रॉल्स रॉयस मला व बिट्टूला हॉटेलामधून पिकअप करायला आली, आम्ही त्याच्या घरी पोहचत होतो. तेव्हा कुणाबरोबर तरी कारमध्ये सतत कच्धी भाषेत संवाद चालू होता.

मला ही कच्छी भाषा कळत नव्हती, मात्र माझ्या मित्राला कळत होतं. आम्हाला थेट घेवून जाण्याऐवजी आम्हाला फिरवून दाऊदच्या घरी नेण्यात येत होतं, जेणेकरून आम्हाला त्याच्या घराचा पूर्ण पत्ता लक्षात राहिला नाही पाहिजे.

आम्ही त्याच्या घरात प्रवेश करताच मला एक माणूस खिडकीतून थुंकताना दिसला. तोच दाऊद होता. त्यानं आमचं स्वागत केलं आणि माफी मागितली आणि म्हणाला- मी तुम्हाला चहासाठी बोलावलं आहे, कारण मी ना दारु पीत, ना कुणाला प्यायला देतो.

दाऊदसोबत ४ तास आम्ही वेळ घालवल्याचा उल्लेख करत ऋषि  कपूर यांनी लिहिलं की, आम्ही दाऊद इब्राहिमबरोबर चार तास घालवले. यावेळी, आम्ही त्याच्या काही गुन्हेगारी कार्यांबद्दल बर्‍याच गोष्टींवर बोललो, ज्याबद्दल त्याला काहीच दु: ख नव्हतं. दाऊदने मला सांगितले कीं, त्यांना मी तवायफ सिनेमांत आवडलो, कारण त्या चित्रपटात माझे नाव दाऊद होतं.

चार तासाच्या या संभाषणात दाऊदने मला माझे वडील, काका, दिलीप कुमार, मेहमूद आणि इतर कलाकारांना किती आवडते हे देखील सांगितलं. मला आठवतं की मी तिथे पोचल्यावर मी किती घाबरलो होतो, पण संध्याकाळपर्यंत माझ्या सर्व चिंता दूर झाल्या आणि मला खूप रिलॅक्स वाटलं.

राज कपूर यांचं निधन झालं तेव्हा दाऊदने एका व्यक्तीला ऋषि कपूर यांच्या घरी त्यांच्या दुखा: सामील होण्यासाठी पाठवलं. यानंतर ऋषी कपूर पुन्हा एकदा दाऊदला दुबईमध्ये भेटले. ऋषि कपूर सांगतात की, जेव्हा ते आणि  नीतू सिंग मॉलमध्ये खरेदी करत होते, त्यावेळी दाऊदही तेथे होता. त्याच्या हातात एक मोबाइल फोन होता आणि 8 ते 10 गार्ड त्याच्याबरोबर होते.

जेव्हा दाऊदने ऋषिसाठी एक शूज खरेदी करण्याची ऑफर दिली दाऊद ऋषिंना पाहून म्हणाला - तुला जे घ्यायचं ते मला तुझ्यासाठी घेवु देतं. ऋषि  म्हणाले- मी फार नम्रपणे नकार दिला आणि म्हणालो- कृपया मला लाजवू नका. मी आपल्या भावनेचे आदर करतो, परंतु मी माझी खरेदी स्वत: करू इच्छित आहे. त्याने मला त्याचा नंबर दिला, परंतु आमच्याकडे मोबाईल नव्हता.

शेवटी दाऊदने मला सांगितले - मी एक फरारी आहे. कारण मला भारतात न्याय मिळणार नाही. तिथे बरेच लोकं आहेत  जे माझ्या विरोधात आहेत. बरेच लोक आहेत. मी काही राजकारण्यांना  पैसे देतो. हे ऐकून मी म्हणालो, “प्लिज मला या सगळ्यापासून लांब ठेव यार.” मी एक अभिनेता आहे आणि मी खरोखर या सर्व गोष्टींमध्ये उतरू इच्छित नाही. तो माझा मुद्दा समजला. तो माझ्याबरोबर नेहमीच चांगला होता. त्यानंतर मी दाऊगला कधीच भेटलो नाही.

शेवटी दाऊदने मला सांगितले - मी एक फरारी आहे. कारण मला भारतात न्याय मिळणार नाही. तिथे बरेच लोकं आहेत  जे माझ्या विरोधात आहेत. बरेच लोक आहेत. मी काही राजकारण्यांना  पैसे देतो. हे ऐकून मी म्हणालो, “प्लिज मला या सगळ्यापासून लांब ठेव यार.” मी एक अभिनेता आहे आणि मी खरोखर या सर्व गोष्टींमध्ये उतरू इच्छित नाही. तो माझा मुद्दा समजला. तो माझ्याबरोबर नेहमीच चांगला होता. त्यानंतर मी दाऊगला कधीच भेटलो नाही.