पुन्हा Ex Boyfriend च्याच प्रेमात पडली Janhavi Kapoor? हा शिखर पहाडिया आहे तरी कोण?

अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूड स्टार्सने आयोजित केलेल्या प्री-दिवाळी पार्टीमध्ये दिसली होती. 

Updated: Oct 25, 2022, 02:02 PM IST
पुन्हा Ex Boyfriend च्याच प्रेमात पडली Janhavi Kapoor? हा शिखर पहाडिया आहे तरी कोण? title=

मुंबई : अभिनेत्री जान्हवी कपूर सध्या बॉलिवूड स्टार्सने आयोजित केलेल्या प्री-दिवाळी पार्टीमध्ये दिसली होती. अलीकडेच, जान्हवी कपूर तिच्या एक्स बॉयफ्रेंड शिखर पहारियासोबत कारमधून जात असताना मेकअपशिवाय दिसली होती.

काही आठवड्यांपूर्वी, करण जोहरने खुलासा केला होता की जान्हवी आणि सारा अली खान खूप चांगल्या मैत्रिणी आहेत आणि त्यांनी एकाच इमारतीत राहणाऱ्या 'दोन भावांना' डेट केलं होतं. अनेक चाहत्यांना असा विश्वास होता की, करण वीर पहारिया आणि शिखर पहारियाचा संदर्भ देत आहे. ज्यांचे सारा आणि जान्हवीसोबतचे फोटो एकदा ऑनलाइन लीक झाले होते.

व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर डेटिंगची चर्चा सुरू झाली
आता शिखर पहारियासोबत जान्हवी कपूरचा एक नवीन व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये दोघंही एका रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना दिसत आहेत. कॅमेऱ्यांसमोर पोज न देता, जान्हवी हसते आणि पुढे जाते. दरम्यान, पापाराझी जान्हवीला आवाज देतात पण ती त्यांच्याकडे दुर्लक्ष करते आणि कारमध्ये बसते. यावेळी अभिनेत्रीने गुलाबी रंगाचा सलवार सूट परिधान केल्याचं दिसत आहे. शिखर पहारिया ड्रायव्हिंग सीटवर दिसला, जान्हवी त्याच्यासोबत पुढच्या सीटवर बसली होती.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

कोण आहे  शिखर पहाडिया?
शिखर पहारिया हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे यांचा नातू आहेत. त्याने आधी जान्हवी कपूरला डेट केलं आणि नंतर ते वेगळे झाले. कॉफी विथ करण 7 वर, करण जोहरने अभिनेत्रीच्या डेटिंगच्या अफवांची पुष्टी केली, "मला म्हणायचं आहे की, हा तुमचा पास्ट होता. तुम्ही दोघी दोन भावांना डेट करत होता. आणि आम्हा तिघांमध्ये सामाईक गोष्ट म्हणजे ते दोघे माझ्या बिल्डिंगमध्ये राहत होते. जान्हवी कपूर लवकरच तिच्या आगामी 'मिली' चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट 4 नोव्हेंबर 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे.