Nita Ambani यांच्या सौंर्दयामागे या व्यक्तीचा हात, एका लूकसाठी घेतो इतकी मोठी रक्कम

नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे?

Updated: Jan 21, 2022, 03:05 PM IST
 Nita Ambani यांच्या सौंर्दयामागे या व्यक्तीचा हात, एका लूकसाठी घेतो इतकी मोठी रक्कम title=

मुंबई : नीता अंबानींचा लूक, मेकअप आणि फॅशन सेन्स नेहमीच लोकांना आश्चर्यचकित करतो. त्यांची स्टाईल प्रत्येक इव्हेंटमध्ये खूप सुंदर आणि क्लासी असल्याचं दिसून येतं. काय आहे नीता अंबानींच्या सौंदर्याचं रहस्य? नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे? हा प्रश्न वारंवार अनेकांच्या मनात येतो. 

नीता अंबानीचा मेकअप आर्टिस्ट कोण आहे याबाबत अनेकांना जाणून घ्यायचे आहे. सध्या नीता अंबानी यांचा मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टर ( Mickey Contractor ) आहे. मिकी कॉन्ट्रॅक्टरने बॉलिवूडच्या अनेक बड्या अभिनेत्रींचा मेकअप केला आहे.

या यादीत करीना कपूर, दीपिका पदुकोण, ऐश्वर्या राय बच्चन, अनुष्का शर्मा यांसारख्या प्रसिद्ध अभिनेत्री आहेत. सध्या मिकी हे कॉन्ट्रॅक्टर नीता अंबानी यांचे वैयक्तिक मेकअप आर्टिस्ट आहेत.

मिकी कॉन्ट्रॅक्टरने अनेक कार्यक्रमांसाठी नीता अंबानींचा मेकअप केला आहे. केवळ नीता अंबानीच नाही तर त्यांनी नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी, सून श्लोका अंबानी यांचाही मेकअप केला आहे.

सूत्रांवर विश्वास ठेवायचा झाल्यास, मिकी कॉन्ट्रॅक्टर मुंबईतील कार्यक्रमासाठी 75 हजार रुपये घेतात, तर मुंबईबाहेर मेकअपसाठी 1 लाख रुपये आकारतात. मिकी कॉन्ट्रॅक्टरला मेकअप आर्टिस्ट बनण्याची प्रेरणा अभिनेत्री हेलनकडून मिळाली होती. 

मिकी कॉन्ट्रॅक्टरला त्याच्या कामासाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. ज्यात हम आपके है कौन, दिल तो पागल है, कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम, कल हो ना हो, मोहब्बतें, माय नेम इज खान, यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे.

डॉन, वीरे दी वेडिंग, गुड न्यूज, इंग्लिश मीडियम. मिकी कॉन्ट्रॅक्टरने या चित्रपटांच्या कलाकारांचा मेकअप केला आहे.

बॉलिवूडची सर्वात सुंदर अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या लग्नाच्या वेळीही मिकीने तिचा ब्राईडल मेकअप केला होता. मिकीने ऐश्वर्याला सर्वोत्तम साऊथ इंडियन ब्राईडलचा लूक दिला.