Shocking: ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ!

Mysterious girl shadow In kim kardashian selfie: वयाच्या 42 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवणारी किम कार्दशियन 2007 मध्ये एका सेक्स टेप प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अशातच आता किम कार्दशियनसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

Updated: Jul 10, 2023, 04:14 PM IST
Shocking: ती होती कोण? किम कार्दशियन एकटी असताना सेल्फीत कैद झाली रहस्यमय सावली; उडाली खळबळ! title=
Mysterious girl shadow In kim kardashian selfie

Kim Kardashian horror Photo: रिअॅलिटी शोमधून प्रत्येकाच्या मनात घर करणारी अभिनेत्री म्हणजे किम कार्दशियन (Kim Kardashian). सोशलाइट, उद्योजक आणि टीव्ही स्टार अशी तिची ओळख निर्माण झालीये. पॅरिस हिल्टनसाठी तिने स्टायलिस्ट म्हणून पदार्पण केलं होतं. वयाच्या 42 व्या वर्षी प्रसिद्धी मिळवणारी किम कार्दशियन 2007 मध्ये एका सेक्स टेप प्रकरणामुळे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. अशातच आता किम कार्दशियनसोबत धक्कादायक घटना घडली आहे.

किम कार्दशियन तिच्या बोल्ड ( Kim Kardashian Bold look) आणि ग्लॅमरस फोटोंमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. नुकतच किमने सोशल हँडलवरून एक सेल्फी (Kim Kardashian Selfie) फोटो शेअर केला होता. यामध्ये किम तिच्या गुलाबी ड्रेसमध्ये खुपच बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत होती. या फोटोमध्ये तिने मेकअप देखील केला नसल्याचं दिसून आलं होतं. मात्र, किमचा हा फोटो पाहून तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. किमच्या फोटोच्या मागे जे काही दिसलं ते पाहून तुमचंही डोकं सुन्नं झाल्याशिवाय राहणार नाही. 

किम कार्दशियन (Kim Kardashian) हिने शेअर केलेल्या फोटोमध्ये एका गरोदर मुलीची सावली दिसत असल्याचं दिसतंय. किमच्या खिडकीच्या पडद्यावर ही सावली (mysterious girl shadow) दिसल्याने सध्या हा फोटो तुफान व्हायरल होत असल्याचं दिसतंय. किमने हा फोटो शेअर करत माहिती दिली. मी हा फोटो मागच्या आठवड्यात घेतला होता जेव्हा मी एकटी होते आणि आता जेव्हा मी माझा फोन पाहते तेव्हा खिडकीत बाईची सावली पाहून मी घाबरून जाते, असं किमने म्हटलं आहे. किमच्या या फोटोवर अनेक मजेशीर कमेंट आल्याचं दिसून येतंय. 

पाहा फोटो 

दरम्यान, कोणत्यातरी वस्तूची सावली महिलेसारखी दिसत आहे, असं एका नेटकऱ्याने म्हटलंय. तर अनेकांनी अनेक मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. नुकतंच किमचं तिचा बॉयफ्रेंड पीट डेव्हिडसनसोबत ब्रेकअप झालं होतं. किम आणि पीटने 9 महिने एकमेकांना डेट केलं होतं. कमी वयाचं कारण देत बॉयफ्रेंडला सोडल्याचं बोललं जातं. अमेरिकन बास्केटबॉल प्लेअर क्रिससोबत किम रिलेशनशिपमध्ये होती. 2011 मध्ये यांचं नातं 72 दिवस टिकलं.