मुंबई : दिवंगत गायक बप्पी लाहिरी त्यांच्या गायकीसाठी जेवढे प्रसिद्ध होते तेवढेच ते सोन्यामुळे प्रसिद्ध होते. बप्पी दा यांच्या प्रत्येक चाहत्याला माहित आहे की, त्यांना सोन्याचे दागिने किती आवडत होते. बप्पी दा नेहमी गळ्यात सोन्याच्या जाड चैन आणि अंगठ्या घालत असत. आता त्यांच्या मृत्यूनंतर बप्पी लाहिरी यांचं एवढं सोनं कोणाला मिळणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
बप्पी दा यांच्या जवळच्या मित्राने एका मुलाखीतमध्ये बोलताना सांगितलं की, 'त्यांचं सोन्याशी खूप जवळचं नातं होतं. त्यांच्यासाठी ते फक्त दागिने नव्हते, तर तो त्यांचा सिग्नेचर लूक बनला होता. हे त्यांना माहीत होतं. अनेकदा लोक बप्पी दा यांच्या सोन्याच्या चैनसोबत सेल्फी मागायचे, तेव्हा बप्पीदा यांना नम्रपणे नकार देत असत. त्यांच्या चैनला कोणी हात लावू नये असं त्यांना वाटायचं. त्यामुळेच कोणी त्यांच्या पाया पडायला आलं जरी आलं की ते थोडं त्यांच्यापासून लांब रहायचे.
बप्पी दा यांच्याकडे सोन्याच्या अंगठ्या, ब्रेसलेट, गणेशजी, हिरे जडित सोन्याचं ब्रेसलेट, सोन्याची फ्रेम आणि कफलिंग आहेत. सध्या या सगळ्या वस्तू डब्यात बंद कपाटात ठेवल्या आहेत. बप्पी दांच्या मुलांनी त्यांना जपण्याचा निर्णय घेतला आहे. वडिलांचा वारसा जपायचा असा त्यांच्या मुलांनी निर्णय घेतला आहे.
एका रिपोर्टनुसार, त्यांची मुलगी रीमा लाहिरी बप्पी दा यांच्या शेवटच्या क्षणात त्यांच्यासोबत होती. बातमीनुसार, बप्पी दाच्या फॅमिली फ्रेंडचं म्हणणं आहे की, 'बप्पी दा यांनी अखेरचा श्वास आपल्या मुलीचा हातावर घेतला. रीमा ही शेवटची व्यक्ती होती जिच्याशी बप्पी दा बोलले होते. त्यांच्या निधनाने संपूर्ण कुटुंब दु:खी झालं आहे.