का होतोय श्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यात उशीर?

एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवींचं अचानक निधन झालं. 

shailesh musale शैलेश मुसळे | Updated: Feb 26, 2018, 09:48 AM IST
का होतोय श्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यात उशीर? title=

दुबई : एका विवाह सोहळ्यासाठी दुबईला गेलेल्या अभिनेत्री श्रीदेवींचं अचानक निधन झालं. 

श्रीदेवी यांच्या पार्थिवावर दुबईमध्ये पोस्टमार्टम करण्यात आलं. पती बोनी कपूर यांच्यासह कुटुंबातील अनेक व्यक्ती दुबईमध्ये आहेत. एका प्रायवेट जेटने त्यांचं पार्थिव मुंबईला आणलं जाणार आहे.

का होतोय उशीर?

अभिनेत्री श्रीदेवींचं निधन शनिवारी रात्री दुबईमध्ये एका हॉटेलमध्ये झालं. त्यामुळे त्यांच्या पोस्टमार्टम आणि इतर कायदेशीर प्रकियेला उशीर होत आहे. कायदेशीर प्रक्रियेनंतर पार्थिव देशात आणलं जाणार आहे. 

काय आहे कायदा?

संयुक्त अरब अमीरातच्या नियमानुसार जर मृत्यू रुग्णालयाच्या बाहेर झाला तर त्याच्या संपूर्ण प्रक्रियेला 24 तास लागतात.  पोस्टमार्टम रिपोर्ट आधी पोलिसांना दिला जातो. त्यानंतर त्यानुसार पोलीस त्याची चौकशी करते. चौकशीत जर काही संशयित गोष्ट न आढळल्यास पोलीस एनओसी देतं. एनओसीच्या आधारावर परिवाराला पार्थिव सोपवलं जातं. श्रीदेवी यांच्या बाबतीत ही संपूर्ण प्रक्रिया सुरु आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर श्रीदेवींचं पार्थिव कुटुंबियांना सोपवण्यात येईल.