सैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा

Why Saif Had Kaeena's Tattoo : सैफ अली खानच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू का होता? तुम्हाला माहितीये का कारण...

दिक्षा पाटील | Updated: Oct 7, 2024, 12:15 PM IST
सैफ अली खाननं का काढला होता करीनाच्या नावाचा टॅट्टू? बेबोचा मोठा खुलासा title=
(Photo Credit : Social Media)

Why Saif Had Kaeena's Tattoo : बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर आणि सैफ अली खान हे जवळपास 12 वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले. लग्नाच्या आधी ते दोघं बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते. इतकंच नाही तर लग्नाच्या आधी सैफ अली खाननं त्याच्या हातावर करीनाच्या नावाचा टॅट्यू देखील काढला होता. आता ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावल्यानंतर करीनानं सैफ अली खानच्या या निर्णयाविषयी सांगितलं आहे,

करीना कपूर आणि करिश्मा कपूर या दोघींनी ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ मध्ये हजेरी लावली होती. त्या शोमधील एक प्रोमो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात करीना कपूर ही तिचा नवरा अर्थात सैफ अली खानविषयी बोलताना दिसत आहे. 

Kapoor sisters as upcoming guest in kapil's show
byu/SB0299 inBollyBlindsNGossip

व्हिडीओमध्ये पाहायला मिळत आहे की कपिल शर्मा, करीना कपूरला करिश्मा विषयी काही प्रश्न विचारताना दिसत आहे. तो विचारतो की 'करिश्माची अशी कोणती सवय आहे जिची तुला फार चीड येते.' तेव्हा उत्तर देत करीना कपूर म्हणाली, 'ही तयार व्हायला खूप वेळ लावते.' त्यानंतर कपिल शर्मानं पुढे प्रश्न विचारला 'तुझी मुलं जास्त मस्ती खोर आहेत की मुलांचे वडील?' त्यावर उत्तर देत करीना म्हणते, 'तुला तर माहित असेलच इतक्या वेळी शोमध्ये येऊन गेलेत.'

यानंतर कपिल शर्मा पुढे म्हणाल, आम्हाला तुझ्या आणि सैफ सरांच्या नात्याविषयी तेव्हा कळलं, जेव्हा त्यांनी तुझ्या नावाचा टॅट्यू हातावर काढला होता. यावर करीना म्हणाली, नाही, नाही... मीच त्याला टॅट्यू बनवण्यासाठी सांगितलं होतं. मी सांगितलं की जर तुझं माझ्यावर प्रेम असेल तर तुझ्या हातावर माझं नाव लिहिशील. 

हेही वाचा : दोन दशकांपासून सुरु असलेला CID शो अचानक का बंद झाला? अमिताभ बच्चन यांच्याशी आहे कनेक्शन? शिवाजी साटम म्हणतात...

दरम्यान, करीना कपूरच्या आधी सैफ अली खान त्याच्या 'देवरा' या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. ज्यूनियर एनटीआर देखील या शोमध्ये दिसला होता. लक्षवेधी गोष्ट म्हणजे कपिल शर्माच्या ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चं दुसरं सीझन गेल्या महिन्यात सुरु झालं. पहिल्या एपिसोडमध्ये करण जोहर, आलिया भट्ट, वेदांग रैना दिसले होते. हे त्यांचा आगामी चित्रपट ‘जिगरा’ च्या प्रमोशनसाठी पोहोचले होते. शनिवारी ओटीटी नेटफ्लिक्सवर ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ चा एपिसोड प्रदर्शित होतो. कीकू शारदा, कृष्णा अभिषेक, राजीव ठाकुर, सुनील ग्रोवर आणि अर्चना पूरन सिंग देखील शोचा भाग होते. 

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x