मुंबई : गेल्या अनेक दिवसानंतर गायक आणि रॅपर यो यो हनी सिंगने 'मखना' या गाण्यातून कमबॅक केलं आहे. हे गाणं रिलीज होताच 4 दिवसात गाण्याला ३ कोटी, ८९ लाख हिट्स मिळाले आहेत. हे गाणं सध्या युट्यूबवर ट्रेंडिग होत आहे. यो-योचं हे गाणं सगळ्यानाच डान्स करण्यासाठी मजबूर करणारं आहे. या गाण्यातील हनी सिंगचा अंदाज देखील अनेकांना हैराण करणारा आहे. हनी सिंगने या गाण्यात म्हटलं आहे की, 'मेरा वेट हो गया है थोडा भारी'. मोठे केस, दाढी आणि गळ्यात सोन्याची चैन अशा अंदाजात हनी सिंग या गाण्यात दिसतो आहे.
हनी सिंगचं मागील गाणं 2014 मध्ये आलं होतं. 'देसी कलाकार' हे गाणं अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिच्यावर तयार केलं गेलं होतं. यानंतर त्याने 'सोनू के टीटू की स्वीटी' या सिनेमात 'दिल चोरी साड्डा हो गया' हे गाणं रिक्रिएट केलं होतं. पण त्याने 'मखना' मधून पुन्हा एकदा कमबॅक केलं आहे.
हनी सिंगने म्हटलं की, 'मखना हे गाणं बनवतांना खूप मजा आली. मी भूषण कुमार यांचे आभारी आहे. याशिवाय येणाऱ्या वर्षात आणखी सहयोगाची अपेक्षा करतो.' मखना हा एक पंजाबी शब्द आहे. याचा अर्थ प्रेमी असा आहे. हे गाणं एक कार्निवल फील देतो. हे गाणं ऐकल्यावर कोणालाही डान्स करण्याचं मन होतं.
हे गाणं कार्निवल लूक देतं त्यामुले प्यूर्टो, रिको किंवा कोलंबिया सारख्या लॅटिन देशांमध्ये शूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. अखेर टीमने क्यूबाला निवडलं. कारण ही जागा भारतासाठी अजूनही अनोळखी आहे.